24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरआजादी गौरव पदयात्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आजादी गौरव पदयात्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात तिस-या दिवशीही आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात दि. ११ ऑगस्ट रोजी शहरातील अंबा हनुमान मंदिरापासून झाली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पदयात्रेला मिळाला.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ब्रिटीश सत्तेच्या विरुद्ध मोठा लढा उभा केला होता. या चळवळीत अनेक नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. भारत देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची धोरणे राबवून सक्षम, बलशाली राष्ट्र उभा केले. काँग्रेस पक्षाने सर्वधर्म समभावाची ध्येयधोरणे आखली, देशाला विकसीत केले. या लढयाचे स्मरण लोकांना व्हावे या करीता आजादी अमृत महोत्सव गौरव यात्रा लातूर शहरातील विविध प्रभागात काढण्यात येत आहे.

तिस-या दिवशी काढण्यात आलेल्या आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात गुरुवारी लातूर शहरातील अंबा हनुमान मंदिर या ठिकाणाहून करण्यात आली. या पदयात्रेचा समारोप जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी करण्यात आला. या पदयात्रेत अ‍ॅड. किरण जाधव, अ‍ॅड. समद पटेल, अ‍ॅड. दीपक सूळ, प्रा. डॉ. स्मिताताई खानापुरे, स्वाती जाधव, सपना किसवे, गणपतराव बाजुळगे, सिकंदर पटेल, इम्रान सय्यद, सुर्यकांत कातळे, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, अ‍ॅड. फारुख शेख, प्रा. प्रवीण कांबळे, जालिंदर बर्डे, सुपर्ण जगताप, अहेमद खान पठाण, सुनील पडीले, रत्नदीप अजनिकर, विकास वाघमारे, हरीओम भगत, आकाश भगत, दत्ता सोमवंशी, गोटू यादव, आसिफ बागवान, बासले हारुन, डॉ. बालाजी सोळुंके, डॉ. रुपाली सोळुंके, युनुस मोमीन, तबरेज तांबोळी. इसरार सगरे, विजय टाकेकर, वर्षा मस्के, सुंदर पाटील कव्हेकर, सिकंदर पटेल, पंडित कावळे, कलीम शेख, अय्युब मणियार, अराफात पटेल, शीतल मोरे, तनुजा कांबळे, बप्पा मार्डीकर, अमित जाधव, अभिजित इगे, अकबर माडजे, विजयकुमार धुमाळ, विठ्ठल गलांडे, बिभीषण सांगवीकर, आसिफ तांबोळी, शैलेश भोसले, महेश शिंदे, राजू गवळी, संदीपान सूर्यवंशी, विकास कांबळे, कुणाल वागज, मैनोदिन शेख, पवन सोलंकर, पवनकुमार गायकवाड, फारुक शेख, युसुफ शेख, अजय वागदरे, श्रीकांत गर्जे, नागनाथ डोंगरे, संजय सुरवसे, गौतम मुळे, अशोक भंडारे, प्रमोद जोशी, जाफर शेख, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, राजेश गुंटे, शेरेकर, पिराजी साठे यांच्यासह लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी होत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या