24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरबी. व्ही. काळे आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

बी. व्ही. काळे आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

एकमत ऑनलाईन

लातूर : मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित कै.बी व्ही काळे आयुर्वेद मेडिकल कॉलेज व रुग्णालय लातूर येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिवस निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दि. ५ ते २५ ऑगस्ट या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. या शिबिर कालावधीमध्ये गरजू तसेच गरीब रुग्णांसाठी मोफत औषधी, अल्पदरात शस्त्रकर्म तसेच मोफत रक्त तपासणी, मोफत अंतररुग्न प्रवेश व पंचकर्म यांचा समावेश असणार असून गरजूनी लाभ घ्यावा, असे आवाहन मांजरा ट्रस्ट लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या लोकसेवेच्या प्रेरणेतून सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी प्रमाणे याही वेळी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन मागील १५ वर्षापासून करण्यात येत आहे. आत्तापर्यंत हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. या शिबिरामध्ये दीर्घकालीन आजार, सांधे व मणक्याचे आजार, आमवात, लकवा, सोरियासिस, वांग उच्चरक्तदाब, मधुमेह, कावीळ, मूळव्याध, फिशर, भगंदर, शरीरावरील गाठी, मुतखडा, पित्ताशयात खडे, स्त्रियांचे विकार, मासिक पाळीचा तक्रारी, मूल न होणे, गर्भाशय सूज, थायरॉईड, लहान मुलांचे विकार, डोळयाचे आजार, कान, नाक घसा विकार, केस गळणे, सौंदर्य समस्या, लठ्ठपणा, कॅन्सर जुनाट सर्दी, डोकेदुखी, पोटाचे विकार आदी आजारांवर विशेष तज्ञ डॉक्टर्सद्वारे चिकित्सा शस्त्रकर्म उपलब्ध होणार आहे. गरजूनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी दररोज सकाळी ९ ते १ या वेळेत बी. व्ही. काळे मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय बस स्टँड पाठीमागे गांधी मैदान लातूर येथे गरजू रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन मांजरा ट्रस्टचे प्राचार्य डॉ. आनंद पवार, आर. एम. ओ. डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या