32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील १३९५८ पदवीधरांची मतदानाकडे पाठ

लातूर जिल्ह्यातील १३९५८ पदवीधरांची मतदानाकडे पाठ

एकमत ऑनलाईन

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील एकुण ४१ हजार ११९ पदवीधर मतदान करतील, या अनुषंगाने व्यवस्था करण्यात आलेली होती. परंतुू, प्रत्येक्षात २७ हजार २३० मतदारांनी मतदान केले असून १३ हजार ९५८ पदवीधरांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या निर्धारीत वेळेत ६६.११ टक्के मतदान झाले.

०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकुण ३५ उमेदवारांनी आपले नशिब आजमावले. त्याचा निकाल आज सर्वांसमोर येणारच आहे. ही निवडणुक राजकीयदृष्ट अतिश्य प्रतिष्ठेची बनली होती. लातूर जिल्ह्यात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण खुप तापले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या सत्ताधारी पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यातच मुख्य लढत झाली. सतिश चव्हाण व शिरीष बोराळकर यांच्या प्रचारात लातूर जिल्ह्यात नियोजनबद्ध यंत्रणा राबविण्यात आली.

दोन्ही उमेदवारांचे मोठे मेळावे झाले. या मेळाव्यांना राजकीय नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते. शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या लातूर जिल्ह्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांपेक्षा अधिक मतदान होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, प्रत्येक्षात मतदानाची टक्केवारी ६६.११ एवढीच राहिली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकसाठी लातूर जिल्ह्यात ४१ हजार ११९ नोंदणीकृत पदवीधर मतदार आहेत. हे सर्वच मतदार मतदान करतील, असे गृहीत धरुन जिल्ह्यात ८८ मतदान केंद्रांची व्यवस्था करुन प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना निर्माण करण्यात आलेल्या होत्या. मतदार मतदान करण्यापुर्वी त्या मतदाराची थर्मल गनद्वारे तपासणी करुन सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग या सर्व आवश्यक बाबींची अंमलबजावणी करण्यात आली.

आरोग्यदायी मतदान व्हावे, अशी सर्व व्यवस्था भारत निवडणुक आयोगाच्या सुचनेनूसार लातूर जिल्हा निवडणुक विभागाच्या वतीने करण्यात आलेली होती. परंतु, प्रत्येक्षात २७ हजार २३० पदवीधर मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेत मतदान केले तर १३ हजार ९५८ पदवीधरांनी मतदानाकडे पाठ फिरवली. आज औरंगाबाद येथे मतमोजणी होणार असून यशाची माळ कोणाच्या गळयात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

६९.६५ टक्के पुरुषांनी तर ५३.५६ टक्के स्रियांनी मतदान केले
४०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील ३२ हजार १३३ पुरुष मतदारांपैकी २२ हजार ३८० मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६९.६५ एवढी आहे तर जिल्ह्यातील ९ हजार ५४ स्त्री मतदारांपैकी ४ हजार ८४९ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ५३.५६ एवढी आहे. इतर ३ मतदारांपैकी एक मतदाराने मतदान केले असून त्याची टक्केवारी ३३.३३ इतकी आहे.

क्रीडापटूंचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या