29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeलातूरउत्तरशेंद-दैठणा रस्त्याची दुरवस्था

उत्तरशेंद-दैठणा रस्त्याची दुरवस्था

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील उत्तरशेंद ते दैठणा रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.रस्त्यावर पाणी साठत आहे. तर काही ठिकाणी मोठे भगदाड पडल्याने प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. प्रवाशी, नागरिकांची होणारी गैरसोय पाहता या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी सरपंच वैशाली परबत माने यांनी केली आहे.

गेल्या दहा वर्षाखाली झालेल्या उत्तर शेंद रस्त्याची त्यानंतर साधी डागडूजीही झाली नाही.रस्त्यावरील खडी उघडी पडली असून जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अशी परिस्थिती झाल्याने जलद सेवा मिळणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरावस्था पाहता संबंधित विभागाने यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दरम्यान उत्तरशेंद गावातुन शिरूर अनंतपाळ शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे.

ग्रामस्थांचा दैनंदिन व्यवहार हा शिरूर अनंतपाळ शहराशी संलग्न असून तालुक्याची ठिकाणी बँकेचे व्यवहार, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार व बाजार करण्यासाठी या भागातील नागरिकांना सतत यावे लागते. मात्र दैठणा गावांपासून उत्तर शेंद गावांपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना प्रवास करणे कठीण जात आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडली असून त्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत या रस्त्याची दहा वर्षात साधी डागडूजी ही झाली नसल्याने रस्ता खराब झाला आहे.संबंधित विभाग मात्र यांकडे डोळे मिटून बघत आहे. रस्त्याची दुरवस्था पाहता या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून ग्रामस्थांची सोय करावी अशी मागणी सरपंच वैशाली परबत माने यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या