चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील बळीराजा खरीप हंगामातील आंतरमशागतीच्या कामाला लागला असून, दुंडणीचे काम, फवारणी,खुरपणी
आदीसह विविध कामे जोरदारपणे सुरू झाली आहेत. तालुक्यातील गावशिवारात गेल्या दहा दिवसांपासून संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पीके धोक्यात आली होती.त्यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला होता. माञ शुक्रवारी पावसाने उघडीप दिली आणि त्यामुळे कंबर कसून आंतरमशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे.रासायनिक खताचे डोस देणे, तणनाशकांचा वापर करून फवारणी करणे, दुंडणी, खुरपणी या विविध आंतरमशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून संततधार पावसामुळे विहीर, कुपनलिका यांची पाणी पातळी वाढली आहे.तसेच नदी नाले ओढे हे दुधडी वाहिले. यामुळे सिंमेट बंधारे,साठवण तलाव, लघु पाटबंधारे, लघु मध्यम पाटबंधारे ८० टक्के भरले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर वन्यजीव यांचा ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच हिरवा चारा जमीनीवर आल्याने जनावरांनी त्या चा-यावर मनसोक्त ताव मारत आहेत. एकंदरीत सध्या खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक धोक्या बाहेर असून सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.c