28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरबाप्पा येणार; रस्त्यांवरील खड्ड्यांचे काय?

बाप्पा येणार; रस्त्यांवरील खड्ड्यांचे काय?

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
श्री गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळ बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. लातूर शहर महानगरपालिकेची प्रशासनाची अद्यापही तशी तयारी दिसून येत नाही. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. गणेशोत्सव सुरू पूर्वी हे खड्डे बुजवणे आवश्यक असले तरी मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.

लातूर शहरातील पाच नंबर चौक, एक नंबर चौक, संविधान चौक, दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोकमान्य टिळक चौक, क्रांतीवीर लहुूजी साळवे चौक (मिनी मार्केट चौक), महात्मा गांधी चौक, मेन रोड, गंज गोलाई, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वामी विवेकानंद चौक ते गरुड चौक हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्या शिवाय औसा रोड, अंबाजोगाई रोड, नांदेड रोडसह शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळणी झालेली आहे. शहरातील एकही रस्ता असा नाही ज्या रस्त्यावर खड्डा नाही. नागरिकांना या खड्ड्यांतूनच ये-जा करावी लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांचाच रस्ता अशी परिस्थिती आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे सुरू केली जातात. त्यावर कोट्यावधींचा खर्च केला जातो. पाऊस सुरु झाल्यानंतर मात्र पहिल्या एक -दोन पावसातच केलेल्या कामाचे पितळ उघडे पडते. रस्त्यावरचे खड्डे पुन्हा होते तसेच दिसून येतात. खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती कामय राहाते. कोट्यावधी रुपयांचा खर्चही पाण्यात जातो. लातूर शहर महानगरपालिकेच्या अखत्यारीत सिमेंट काँक्रिट, डांबरी व पेव्हर ब्लाकचे रस्त आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक या सिमेंट काँक्रीटचा रस्ता पुर्णत: उखडला आहे. डांबरी रस्त्यांची तर खुप दुरवस्था झालेली आहे. डांबरी रस्त्यावर डांबरातील ‘बिटूमन’च्या गुणधर्मामुळे पावसाचे पाणी संपर्कात आल्याने खड्डे पडतात, असे मनपा प्रशासनाचे म्हणने आहे. यंदाच्या जुलै महिन्यातील संततधार पावसाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या