27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरबसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली

बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली

एकमत ऑनलाईन

निलंगा : महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अनुभव मंटपच्या माध्यमातून जगाला लोकशाहीची देणगी दिली आहे. स्त्री-पुरुष समानता व सामाजिक समतेचा संदेशासोबत महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

निलंगा येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अनुभव मंटप व महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणीजनांचा सत्कार सोहळा व बसव व्याख्यानमालेत आमदार निलंगेकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी संगण बसव महास्वामीजी हे होते. यावेळी बसवपिठावर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य, डॉ अरंिवंद भातांब्रे,व्याख्यानमालेचे मुख्य वक्ते प्रा. डॉ. राजशेखर सोलापुरे उपस्थित होते.

‘बसव विचारांची वर्तमानातील उपयुक्तता’ या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले की, माणसाला माणूस बनविण्यासाठी बसव विचार आवश्यक असून काम करणा-या माणसाला प्रतिष्ठा देण्याचे काम बसवेश्वरांनी केले आहे. बसवेश्वर इतिहासाचे गायक नव्हे तर नायक होते. राज्याचा प्रधानमंत्री कसा असावा याचा आदर्श आपल्या आचार व विचारातून बसवेश्वरांनी जगासमोर मांडला आहे. देशात देवालय नाहीतर ग्रंथालयाची गरज असून माणसाला सक्षम बनविण्यासाठी बसवेश्वरांच्या वचन साहित्याची आवश्यकता आहे. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी बसवण्याच्या विचाराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रत्नेश्वर गताटे व राजकुमार नीला, व्यापारी सिद्राम चाकोते, शिवप्रसाद मुळे, धनराज स्वामी, शिवकुमार नीला, शिवा मेंगले, बुद्धिवंत मुळे, प्रशांत सोरडे, शिवकुमार रुकारे, ंिपटू फुलारी, प्रगतिशील शेतकरी प्रमोद धर्मशेट्टी, प्रा. विश्वनाथ शेटकार, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त रुद्रमणी पोंगळे, श्रीमती शोभाताई सलगरे आदी गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक श्रीशैल बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन सुनील मुळे यांनी तर आभार डॉ.मन्मथ गताटे यांनी मानले. याप्रसंगी प्रल्हाद बाहेती, विलास सुर्यवंशी, अजित माने, बाबुराव सूर्यवंशी,धम्मानंद काळे, अण्णासाहेब मिरगाळे, रजनीकांत कांबळे, रोहित बनसोडे, दत्ता शाहीर, अ‍ॅड. नारायण सोमवंशी, शेषेराव ममाळे, चक्रधर शेळके, रामंिलंग पटसाळगे, दयानंद चोपणे यांच्यासह बसव प्रेमी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या