24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरजीवनात कुशल कर्म करून शीलवान व चारित्र्यवान बना

जीवनात कुशल कर्म करून शीलवान व चारित्र्यवान बना

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मानवी जीवनामध्ये चारिर्त्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे सर्वांनी कुशल कर्म करून शीलवान व चारिर्त्यसंपन्न बनले पाहिजे असे प्रतिपादन बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरीटेबल ट्रस्ट, लातूरचे अध्यक्ष डॉ. उपगुप्त महास्थवीर यांनी केले.
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरीटेबल ट्रस्ट, लातूरद्वारा २५५६ वी तथागत भगवान बुद्ध जयंती महोत्सव महाविहार धम्म केंद्र, सातकर्णीनगर, रामेगाव येथे झाला. या कार्यक्रमामध्ये प्रमुख धम्मदेशना देताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पू.भन्ते संघरत्न (पूर्णा), उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) राजेंद्र जगदाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) सुनिल गोसावी, सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष डी. एस. नरसिंगे, गातेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घारगे, अ‍ॅड. एस. एन. बोडके आणि लक्ष्मण शिंदे (पूर्णा) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूरचे सचिव भिक्खू पय्यानंद यांनी केले. यावेळी राजेंद्र जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये पब्बजा श्रामणेर शिबिरातील ४५ प्रशिक्षणार्थाचे स्वागत करण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये भोजनदान व चिवर दान देणा-या उपसिका ज्ञानेश्वरी बटवाड यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले. तर आभार केशव कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.विजयकुमार अजनीकर, प्रा. देवदत्त सावंत, पांडुरंग आंबुलगेकर यांच्यासह अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, डॉ. संजय गवई, पंडित सूर्यवंशी, भीमराव चौदंते, परमेश्वर आदमाने, भरतकांबळे, बालाजी धायगुडे, डॉ. अरुण कांबळे आदिनी मौलिक सहकार्य केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या