निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार दि. २० सप्टेंबर रोजी घंटा नाद आंदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली स्थगिती उठविणे, मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून ओबीसीचे आरक्षण वाढविणे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरक्षण अबाधित ठेवणे, नोकरीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळणे व नियुक्ती मिळालेल्यांना संरक्षण मिळणे, आरक्षणाचा अंतिम निकाल येईपर्यंत निम सरकारी व सरकारी नोकरभरती करण्यात येऊ नये, सारथी संस्थेला भरीव निधी उपलब्ध करून देऊन ती सक्षम करावी.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास भरघोष निधी उपलब्ध करून मराठा युवकास उद्योगास प्रवृत्त करणे, मराठा विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक शिष्यवृत्या पुर्ववत चालु ठेवणे, मराठा मुलींच्या वसतीगृहाची उभारणी ताबडतोब करण्यात यावी आदी मागण्यांचा पाठपुरावा करून मराठा समाजास न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव
पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन करून त्यांना सकल मराठा क्रांती मोर्चा निलंग्याच्या वतीने मागण्यांचे निवेदन आले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, एम. एम. जाधव, लालासाहेब देशमुख, डॉ. उद्धव जाधव, चेअरमन अरुण सोळुंके, अॅड. तिरुपती शिंदे, मधुकर माकणीकर, बजरंग जाधव, ईश्ववर पाटील, विनोद सोनवणे, छावाचे प्रेदश अध्यक्ष विजय घाडगे, भगवान माकणे, सुबोध गाडीवान, आनंद जाधव, पिंटू पाटील, प्रा. हंसराज भोसले, सतीश हणेगावे, कुमोद लोभे, अजित लोभे, दगडू सोळुंके, शाहुराज थेटे, आर. एन. बरमदे, गणेश गायकवाड, अशोक वाडीकर, संभाजी जावळे, पिंटू सगरे, प्रदीप कदम, किशोर जाधव, प्रमोद कदम, डी. एन. बरमदे, कुलदीप सूर्यवंशी, माधव गाडीवान, सौ. अर्चना जाधव, श्रीमती राजेश्री शिंदे, श्रीमती सुंदर बोंडगे, सौ लता जाधव, माधुरी जाधव, उत्कर्षा बिरादार, श्रेया सपकाळ आदी उपस्थित होते.
समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी बांधील
मी कायम समाजासोबत असून यापुढेही समाजाच्या मागण्यांसाठी विधानसभेत आग्रही राहून समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी बांधील राहणार असल्याचे अभिवचन माजी कॅबिनेट मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आंदोलन कर्त्यांना दिले.
औसा शहरासह तालुक्यात पावसाचा कहर