24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरहजारो लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

हजारो लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शहरातील एकुण १८ प्रभागांतील निराधारांना त्यांच्या प्रभागात जाऊन त्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरुन घेण्यापासून ते त्यांना लाभ मिळवून देण्यापर्यंतचे सर्व कार्य लातूर शहर संजय गांधी निराधार योजना समिती व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करावे, अशी सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली होती. तसेच त्यांच्या संकल्पनेतून शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १८ या सर्वच प्रभागांत समाधान शिबिरे झाली. या शिबिरांच्या माध्यमातून हजार लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देता आला, असे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी सांगीतले.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहरात प्रभागनिहाय संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नुकतेच प्रभाग १८ मध्ये शातीनिकेतन शाळा, पटेलनगर, लातूर येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबीर झाले. या शिबीरास पात्र लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात अ‍ॅड. किरण जाधव बोलत होते.

लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये नुकतेच समाधान शिबीर पार पडले. यावेळी शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, प्रदेश काँगे्रसच्या सरचिटणीस विद्या पाटील, असगर पटेल, सिकंदर पटेल, लायक पटेल, सुंदर पाटील कव्हेकर, संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहरचे चेअरमन हकीम शेख, दगडूआप्पा मिटकरी, राजू चिंताले, भालचंद्र सोनकांबळे, नरेश कुलकर्णी, लक्ष्मण कांबळे, अथरोद्दिन काझी, शीतल मोरे, यशपाल कांबळे, सिध्देश्वर
उकरडे, मंडळ अधिकारी झाडे, तलाठी सानिया सौदागर, महाइसेवा केंद्राचे कर्मचारी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुख, तहसीलचे कर्मचारी, निराधार महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलताना अ‍ॅड. किरण जाधव म्हणाले, काँग्रेस पक्षाचा हात हा सर्व सामन्य जनतेचा हात आहे. काँग्रगेसचा सर्वधर्म समभावाचा विचारच प्रगतीच्या दिशेने जातो. काँगे्रस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू माणुन कार्य करावे, हा विकासरत्न विलासराव देशमुख यांनी दिलेला विचार घेऊन आम्ही सर्वजण माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत. त्यांच्या सूचनेनूसारच शहरातील सर्वच प्रभागांत समाधान शिबिरे आयोजित करुन हजारो निराधारांना लाभ देता आला, असेही ते म्हणाले.

या शिबीराच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर समाधान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेसाठी प्रभाग १८ मधील एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाधान शिबिरास ऊस्फुर्त प्रतिसाद मिळाला. समाधान शिबीर अमोल माने, सुनील इपर, वसीम शेख, अमोल मुडे, प्रशांत शिंदे यांच्यासह प्रभाग कार्यालय समन्वयक रियाज सय्यद उपस्थित होते. समाधान शिबीर यशस्वीपणे पार पडल्यामुळे लाभार्थीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या