33.6 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeलातूरबहुजनांना दाखवलं माय दिल्लीकडे भिमानं बोट ....

बहुजनांना दाखवलं माय दिल्लीकडे भिमानं बोट ….

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
बहूजनांना दाखवलं माय दिल्लीकडे भिमाने बोट! या भिम गितास उपस्थितांनी डोक्यावर घेतले. सध्याची राजकीय स्थिती आणि बहूजनांची झालेली मनस्थिती यावर भाष्य करणारे हे गीत गाऊन मंत्रमुग्ध केले. यावेळी महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जळकोट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त व्यंकटराव तेलंग मित्र मंडळाच्या वतीने भिम शाहीर लोककलावंत साहेबराव येरेकर यांच्या भीम गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भीम शाहीर साहेबराव येरेकर यांनी एकाहून एक अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भीम गीते सादर करून प्रेक्षकांची वाह वाह मिळवली. या कार्यक्रमास जळकोट शहर तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .

व्यंकटराव तेलग मत्रि मंडळाच्या वतीने जळकोट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भीम शाहीर साहेबराव येरेकर यांच्या भीम गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जळकोट नगरीचे प्रथम नगराध्यक्ष व्यंकटराव तेलंग यांच्या हस्ते झालेक़ार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बालाजी केंद्रे,नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, नगरसेविका सुरेखा गवळे, भाजपा सत्यवान पांडे, नगरसेवक बाळू देवशेट्टे, भाजपाचे बालाजी तिडके, शिवसेनेचे शंकर सोपा, भाजपाचे माजी शहराध्यक्ष माधव मठदेवरू, बालाजी कांबळे , व्यंकटराव तेलंग मित्र मंडळाचे अध्यक्ष दिलीप कांबळे , सरपंच बोडके, संग्राम गायकवाड, पिराजी कोकणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, माजी नगरसेवक अर्जुन वाघमारे , शामसुंदर गवळे यांची प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी साहेबराव येरेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपल्या भीम गीतातून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . सध्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे पैसे देऊन मत विकत घेतले जात आहेत. याबाबतही त्यांनी भीम गीतातून प्रबोधन केले, पूर्वीच्या काळी बहुजनांना निवडणुकीमध्ये उभा टाकायची परवानगी नसत असे परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे आता मतदानाचा अधिकार तरी मिळालाच आहे परंतु निवडणुकीला उभा टाकण्याचा अधिकारही प्राप्त झाला आहे . यासोबतच त्यांनी युगपुरुष लाभले एक स्वराज्याची शान दुसरा घटनाकार महान हे गीत सादर केले या गीतातून छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उपलब्धता देशासाठी महान कशी आहे हे दाखवून दिले .

यासोबतच बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधी फिटणार नाहीत या गीताने देखील बाबासाहेब आंबेडकर यांनी जी उपलब्धता करून दिली आहे याचे आपल्या भीम गीतातून येरेकर यांनी उपस्थित नागरिकांना जाणीव करून दिली . यासोबतच महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या काळामध्ये विधवा महिलांसाठी कशाप्रकारे मदत केली , तसेच सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शाळा कशा सुरू केला याचा फायदा कसा झाला याची माहितीही आपल्या अमृतवाणीतून उपस्थितांना दिली. या कार्यक्रमास हजारो नागरिकांची उपस्थिती होती . जळकोट नगरीचे प्रथम नगराध्यक्ष व्यंकटराव तेलंग यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परकोटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता .

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या