23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरलातुरात भोई समाज जातपंचायत संपुष्टात

लातुरात भोई समाज जातपंचायत संपुष्टात

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील भोई समाजातील जातपंचायत संपुष्टात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकाराने भोई समाजाने हा निर्णय घेतला असून जातपंचायत संपूष्टात आल्याचे भोई समाजाच्या वरिष्ठांनी १०० रुपयांच्या बाँडपेपरवर लिहून दिले आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. या देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज घटकाचा विचार करुन अतिशय आदर्शवत राज्य घटना दिली. ती २६ नोव्हेंबर १९५० पासून आपण स्वीकारली. परंतु आजपर्यंत याच देशात जातपंचायतीच्या नावाखाली समांतर न्याय व्यवस्था चालू होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या व त्यानंतर अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा चांदगुडे यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांनी जातपंचायती संपुष्टात आणण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. जात पंचायतीच्या नावाखाली त्याच समाजातील स्वयंघोषित पंच त्याच समाजाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक मानसिक शोषण करीत होते. अमाप दंड आकारला जायचा. दंड नाही भरला तर त्या कुटुंबाला बहिषकृत केले जायचे. बहिषकृत केलेल्या कुटुंबाला त्या समाजातील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नसे. त्यांचं अमानुष छळ केला जातो. या बाबत अशा अनेक बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. महाराष्ट्र शासनाने २०१६ ला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर केला. तो जुलै २०१७ पासून राज्यात लागू झाला. राज्यभरात आजपर्यंत जवळपास १५० हून अधिक गुन्हे या कायद्यांतर्गत नोंद झाली आहेत.

लातूर शहरात भोई समाज फार मोठ्या प्रमाणत आहे. या समाजात पूर्व परंपरेनुसार जात पंचायतीत न्यायनिवाडे होत होते. या जातपंचायतीना कसलाही कायदेशीर आधार नव्हता. लातूर जिल्ह्यात जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी नुकतेच जिल्ह्यात जादूटोणा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या बाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलनच्या वतीने प्रबोधन अभियन राबवले. त्याचाच एक भाग म्हणून विवेकानंद पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, महा. अंनिस चे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे व पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी एका कार्यक्रमात याबाबत भोई समाज समुहासमोर या कायद्याबाबत व त्याच्या गंभीर परिणामांची जाणीव करुन दिली. यावेळी भोई समाजातील नागनाथ सुरेश गवते यांच्या नेतृत्वाखाली ७६ समाज बांधवांनी भोई समाज जातपंचायत बरखास्त करण्याचा लेखी निर्णय जाहीर केला. तसे १०० रुपयाच्या बाँडवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि पोलिस निरीक्षक विवेकानंद पोलिस चौकी यांचे नावे लेखी निवेदन दिले आहे.

भोई समाज बांधवांनी हा विधायक निर्णय सामूहिकपणे लेखी स्वरुपात जाहीर केल्यामुळे त्यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे वार्षिक अंकसह सर्व अंक व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची सचित्र पुस्तिका देवून त्यांचा जितेंद्र जगदाळे, माधव बावगे व सुधाकर बावकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या