21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरभूमिपुत्रांना लातूर जि. प. ची दारे बंद

भूमिपुत्रांना लातूर जि. प. ची दारे बंद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रिया चालू आहे. या बदली प्रक्रियेसाठी लातूर जिल्हा परिषदेने रिक्त पदाचा अहवाल शून्य कळविल्याने जिल्हया बाहेररून लातूर जिल्ह्यात येणा-या भूमिपुत्र शिक्षकांसाठी लातूर जिल्ह्यात येणे कठीण झाले आहे. लातूर जिल्हा परिषदेने शिक्षक पदाचा शुन्य अहवाल शासनाला कळवला आहे. लातूर जिल्ह्यातील शेकडो भूमिपुत्र शिक्षक अनेक वर्षापासून राज्यातील विविध जिल्हा परिषदेमध्ये सेवा देत आहेत. लातूर जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीने येण्यासाठी अनेक वैध-अवैध मार्गाचा अवलंब आजवर करण्यात आला आहे. आपसी आंतरजिल्हा बदल्यांचा लातूर पॅटर्न तर राज्यभर गाजला होता. दि. ७ एप्रिल २०२१ च्या नवीन आंतरजिल्हा बदली धोरणानुसार सध्या ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू केली आहे.

या प्रक्रियेचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम ंिवसिस नावाच्या कंपनीला दिले गेले आहे. या बदली प्रक्रियेत कालची रिक्त पदाचा अहवाल अपलोड करण्याची शेवटची मुदत होती. काल सायंकाळी लातूर जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांचा रिक्त पदाचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यात सर्व प्रवेगाची रिक्त पदांची संख्या शून्य कळवल्याने आंतरजिल्हा बदलीने येणा-या शेकडो भूमिपूत्र शिक्षकांचे स्वप्न यावर्षी भंगले आहे. इतर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या १ हजार ७९४ प्राथमिक शिक्षकांना व ३५ माध्यमिक शिक्षकांना कार्यरत जिल्हा परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. पैकी आजवर ३३९ शिक्षकांना लातूर जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदल्या मिळालेल्या आहेत. उर्वरित १ हजार ४९५ शिक्षकांना लातूर जिल्ह्यात येण्याचे वेध लागले असताना रिक्त पदाचा अहवाल शून्य कळवल्यामुळे भ्रमनिरास झाला आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या विविध प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची अनेक रिक्त पदे असतानादेखील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेत रिक्त पदे शून्य का कळवली याबाबत शिक्षकांमध्ये वेगवेगळया चर्चा होत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या