22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरबिहारचे कायदा मंत्री प्रमोदकुमार यांनी केले लातूरचे सिद्धेश्वर देवस्थानच्या कार्याचे कौतुक

बिहारचे कायदा मंत्री प्रमोदकुमार यांनी केले लातूरचे सिद्धेश्वर देवस्थानच्या कार्याचे कौतुक

एकमत ऑनलाईन

लातूर : बिहार राज्याचे कायदा व ऊस उद्योग मंत्री प्रमोदकुमार यांनी दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विश्वस्तांकडून संस्थानच्या कार्याची माहितीही घेतली. मंत्री प्रमोदकुमार हे लातूर दौ-यावर असताना पवित्र श्रावण मासानिमित्त त्यांनी लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान येथे येऊन मनोभावे दर्शन घेत पूजा व आरती केली. याप्रसंगी देवस्थानच्या प्रशासक ही. का. शेळके यांच्यासह विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विश्वस्त अशोक भोसले, नरेशकुमार पंड्या, श्रीनिवास लाहोटी, बाबासाहेब कोरे, अप्पासाहेब घुगरे, विशाल झांबरे, धनंजय बेंबडे, चेतन कोले, व्यवस्थापक दत्ता सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. देवस्थानच्या वतीने मंत्री प्रमोदकुमार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.प्रमोदकुमार यांनी संपूर्ण देवस्थान परिसराची फिरुन पाहणी केली.

देवस्थानचे कार्य कसे चालते याची माहिती विश्वस्त मंडळाकडून जाणून घेतली. बिहारमध्ये कायदा मंत्रालयाच्या अंतर्गत देवस्थानांचा कारभार धार्मिक संस्था विकास प्राधिकरण अंतर्गत चालवला जातो. सिद्धेश्वर देवस्थानच्या कार्यप्रणालीतील महत्त्वाच्या बाबींचा त्यात अंतर्भाव करता येऊ शकतो याची माहिती घेत महाराष्ट्र राज्य धर्मादाय नियमावली याचा अवलंब बिहारमध्ये करणार आहे, असेही ते म्हणाले. देवस्थानचा होत असलेला विकास, पारंपारिक वारसा जपत केली जाणारी भाविकांची सेवा पद्धतीची कामे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच विकासरत्न विलासराव देशमुख व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शासनाच्या वतीने दिलेल्या भरीव निधीमधून हाती घेण्यात आलेली विकास कामे याबाबतची माहिती विक्रम गोजमगुंडे यांनी त्यांना दिली. या सर्व बाबी जाणून घेत लातूरच्या सिध्देश्वर देवस्थानचा पॅटर्न बिहारमध्ये राबविणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या