24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeलातूरभाजपा आमदार अभिमन्यू पवारांनी केले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या "माझे...

भाजपा आमदार अभिमन्यू पवारांनी केले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या “माझे कुटूंब,माझी जबाबदारी ” मोहिमेचे कौतुक

एकमत ऑनलाईन

औसा  (प्रतिनिधी) : ” माझे कुटूंब  माझी जबाबदारी  ” ही मोहिम राज्यभरात राबविणे ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची योजना असून कोरोनावर मात करण्यासाठी सरकारची ही चांगली योजना असल्याचे कौतुक भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केले . व आपण स्वतः याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले आहे . दि.१७ सप्टेंबर रोजी औसा तहसील कार्यालय या मोहिमेचा शुभारंभ आ,पवार यांनी केला. व  कोरोना केअर सेंटरला भेट देवून आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. औसा तहसील कार्यालयात आयोजित ”  माझे कुटुंब माझी जबाबदारी  ” या मोहिमेचा शुभारंभ आ.अभिमन्यू पवार यांनी केला.

या मोहिमेच्या संदर्भात त्यांनी मतदार संघातील आशा कार्यकर्त्यांशी आॕनलाईन संवाद साधत मोहिम मतदारसंघातील गावात प्रभावीपणे राबविण्यासाठी आ. अभिमन्यू पवार हे स्वतः हा काही गावाला भेट देवून या मोहिमेत सहभागी होणार असल्याचे सांगितले . व  त्यांनी  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा   कार्यकर्त्या व सुपरवायझर यांचा गौरव केला. यावेळी तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ,पंचायत समितीचे सभापती अर्चना गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख , कर्मचारी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होते..

आज देशाचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून देशभरात सेवा सप्ताहाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त औसा येथील कोरोना केअर सेंटरला आ.अभिमन्यू पवार यांनी भेट देवून वाफेच्या कीट्स वितरित केले. नागरसोगा याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले . औसा येथील केदारनाथ पेट्रोलियम येथे मास्क, सॅनिटायझर कीट्स वितरित केले आदी कार्यक्रमाचे आयोजन  आले . यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,संतोष मुक्ता, भाजपाचे नगरपालिकेतील  गटनेते सुनील उटगे, सुशीलदादा बाजपाई,अॕ ड. मुक्तेश्वर वागदरे,अॕड अरविंद कुलकर्णी,.भिमाशंकर राचट्टे , नगरसेवक गोपाळ धानूरे ,समीर डेंग , उन्मेश वागदरे ,संजय माळी ,भिमाशंकर मिटकरी,  पंचायत समिती सदस्य दिपक चाबुकस्वार,  धनराज परसणे, अच्युत पाटील,गंगाधर इसापुरे , व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या