22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home लातूर दूध दरावरून लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन

दूध दरावरून लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन

एकमत ऑनलाईन

दुध दराप्रश्नी भाजपाचे निलंग्यात रास्तारोको
निलंगा : शासनाने शेतक-यांच्या दुधाला प्रतीलिटर दहा रुपये तर, दुध भुकटीला पन्नास रुपये प्रति किलो अनुदान द्यावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी येथील उदगीर मोड येथे रास्तारोको आदोलन करण्यात आले. यानंतर भाजपाच्या वतीने उपविभागीय अधिकारी विकास माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा महाराष्ट्रात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत सापडलेला आहे. या अडचणीत असलेल्या शेतक-यांना न्याय मिळावा याकरीता उदगीर मोड येथे निलंगा तालुका भाजपाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतक-यांना न्याय मिळावा याकरीता सरसकट प्रतीलिटर दहा रुपये अनुदान मिळावे, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या होत्या. मात्र अद्यापही याबाबत सरकारकडून कोणताच निर्णय न झाल्याने हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे यांनी दिली.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, माजी पं. स. सभापती अजित माने, तालुकाध्य्यक्ष शाहुुराज थेटे, हरीभाऊ काळे, उपाध्यक्ष मनोज कोळ्ळे, रिपाइंचे अंकुश ढेरे, अशोक वाडीकर, कुमोद केशवराव लोभे, रविशंकर फुलारी, प्रमोद पाटील, सुमीत ईनानी, नागेश पाटील, बाळासाहेब पाटील, अशीष पाटील, प्रशांत पाटील, अविनाश बिराजदार, तम्मा गाडीबोने, तुकाराम माळी, सचिन पोदार, नागेंद्र पाटील, जि. प. सदस्य डॉ. संतोष वाघमारे, संजय हलगरकर, सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते.

दूध दरवाढ प्रश्नावर चाकुरात आंदोलन
चाकूर : अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दूधाचा खरेदी दर ३० रुपये प्रती लिटर करावा, या मागण्यांसाठी भाजपा महायुतीच्या वतीने शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांच्या नेतृत्वाखाली चाकुरातील जुने बसस्थानक येथे महाएल्गार आंदोलन करण्यांत आले.

भाजपासह महायुतीतील मित्र पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींसह आजी-माजी लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलनात सहभाग नोंदविला. भाजपा आणि महायुतीतील रासप, रिपाइं आठवले गट, शिवसंग्राम, रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात पक्षाचे ध्वज, बॅनर हातात घेऊन तोंडाला मास्क लावून हे आंदोलन यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, माजी पं. स. सभापती वसंतराव डिगोळे, जि. प. समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील, कृृृृऊबा उपसभापती अशोक चिंते, भाजयुमो तालुकाध्यक्ष दयानंद सूर्यवंशी, सरपंच अजीत खंदारे, शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे, अशोक शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर अनंतपाळ येथे महायुतीचे रास्तारोको आंदोलन
कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला सरसगट प्रती लिटर १० रुपये अनुदान द्यावे, दूध भूकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दूध खरेदीचा दर ३० रुपये प्रति लिटर करावा, या मागण्यांसाठी भाजपा महायुतीच्या वतीने जि. प. चे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती आणि रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पांढरवाडी पाटी येथे दि. १ ऑगष्ट रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भाजपा व महायुतीतील रयत क्रांती संघटना, रासप, आरपीआय आठवले गट यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जि. प. चे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती व रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे, माजी जि. प. सदस्य ऋषीकेश बद्दे, भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, माधव बिरादार, पंडीतराव शिंदे, अनिल शिंदे, गोविंदराव पोतदार, नागनाथ चलमले, संतोष डोंगरे, सतीश भिक्का, पंकज रक्साळे, गणेश मोहिते, अशोक सूर्यवंशी, गणेश खरटमोल, संग्राम डोंगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

औराद शहाजनी येथेही रास्तारोको
औराद शहाजनी : भाजपाच्या वतीने शासनाच्या विरोधात व दूध उत्पादक शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी येथील शिवाजी चौक येथे सकाळी अकराच्या सुमारास कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मोजक्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करुन आंदोलन केले.

यानंतर दुध उत्पादक शेतक-यांना अनुदान देण्यात यावे, दुध भुकटीसाठी अनुदान देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार गणेश जाधव यांना ई-मेल करण्यात आले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष राजा पाटील, सुधाकर शेटगर, शिवकुमार मंडगे, मल्लिकार्जुन लातुरे, देवप्पा देशमुख, महेबूब पठाण, प्रकाश टेंकाळे, विनोद सोनी, शालिवान शिंदे, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

शेतक-यांच्या दुध प्रश्नावर अहमदपुरात भाजपाचे रास्तारोको आंदोलन
अहमदपूर : शेतक-यांच्या दुध प्रश्नावर भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहमदपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता रास्तारोको आंदोलन करून उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसस्थानकासमोर आंदोलनाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धअभिषेक माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर रास्तारोको आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. सध्या शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याने दुध उत्पादक शेतक-यांना प्रति लिटर १० रुपये अनुदान देण्यात यावे, दुध भुकटी निर्यातीला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, गाईचा दुध खरेदी दर प्रति लिटर ३० रुपयांनी करावा, अहमदपुर शहरातील चालू असलेली शासकीय दुध डेअरी बंद करून दुस-या गावाला स्थलांतरीत केली आहे, स्थलांतरीत दुध डेअरी रद्द करून पूर्ववत शहरात चालू करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

या आंदोलनात भाजपाचे प्रदेश सदस्य माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, जिल्हा चिटणीस शरद जोशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेश ढाकणे, माजी जि. प. सदस्य देवानंद मुळे, अ‍ॅड. अमित रेड्डी, हणमंत देवकते, पं. स. उपसभापती बालाजी गुट्टे, सदस्य रामभाऊ नरवटे, राजकुमार खंदाडे, व्यंकटी जाभाडे, गोविंदराव गिरी, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, लक्ष्मीकांत कासनाळे, राहूल शिवपुजे, निखिल कासनाळे, सुधीर गोरटे, देविदास सूरनर, यतीराज केंद्रे, संजीव मुसळे, प्रताप पाटील, महेश बिलापट्टे, श्रीकांत शर्मा, हरीराम गुट्टे, हेमंत गुट्टे, आनंद गुट्टे, हरिश्चंद्र बलशेटवार, शिवानंद भोसले, गणेश कापसे, चोले शिवदास, शुकूर जागीरदार, सौ. गयाबाई सिरसाठ, जयश्री केंद्रे, आनंद देवकते, सुभाष सोनकांबळे, परमेश्वर पाटील, संतोष कोटलवार, शंकर मुळे, बबनराव नवटक्के, विष्णु पौळ, शिवराज चोथवे, ज्ञानोबा जायभाय यांच्यासह भाजपा व महायुतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.

दुधाच्या भाववाढीकरिता देवणीत भाजपा महायुतीचे आंदोलन
शासनाने दुधाच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं (आठवले गट) यांच्या वतीने शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी येथील बोरोळ चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. शासन शेतक-यांकडून कमी किंमतीत दूध खरेदी करून शेतक-यांची थट्टा करत आहे. शासनाने दूध उत्पादक शेतक-यांना सरसकट ५० रुपये प्रती लीटर हमीभाव द्यावा व प्रति लीटर दहा रुपये वाढीव अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करावे तसेच गाईचे दूध सरसकट ३० रुपयांप्रमाणे खरेदी करावे या प्रमुख मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पटणे, तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, नगराध्यक्ष वैजिनाथ आष्टुरे, जि. प. सदस्य प्रशांत पाटील, नगरसेवक मच्छिंद्र नरवटे, नामदेव कांबळे, बाबुराव इंगोले, माजी उपसभापती यशवंत पाटील, रामलिंग शेरे, अमर पाटील, शहराध्यक्ष अटलविश्वास धनुरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा प्रमुख आनंद जीवने, युवा नेते तुकाराम पाटील, सुधीर भोसले, संगम पाताळे, बाळासाहेब बिरादार, ओम धनुरे, अलीम शेख, मयूर पटणे, बिरू कल्याणकर आदींसह इतर नागरिक उपस्थित होते.

किनगावातही रास्तारोको आंदोलन
किनगाव : भारतीय जनता पार्टी, रासप, रिपाई, शिवसंग्राम महायुतीच्या वतीने दुधाला सरसकट प्रतिलीटर दहा रुपये अनुदान द्यावे, गाईच्या दुधाला प्रति लीटर तीस रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी किनगाव येथील सावरकर चौक येथे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी जि. प. सदस्य अशोक केंद्रे, रासपचे जिल्हा सरचिटणीस धनराज गिरी, रिपाइंचे  जिल्हा उपाध्यक्ष सुनिल वाहुळे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष याकूब शेख, तालुकाध्यक्ष रतन सौदागर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष माधव मुंडे, पं. स. सदस्य माणिक नरवटे, माजी सरपंच विठ्ठलराव बोडके, ज्ञानोबा शृंगारे, देवकराचे सरपंच व्यंकट सुरवसे, उपसरपंच भास्कर गुट्टे, गुंजोटीचे सरपंच सतीश येमले, उपसरपंच राम चव्हाण, केंद्रेवाडीचे उपसरपंच बंडू केंद्रे, शिवहार केंद्रे, माऊली दहिफळे, दत्तू कातकडे, सुनिल मुंडे, तुकाराम फड, चंद्रप्रकाश हंगे, संग्राम मुंडे, गोविंद चाटे, धनराज बोडके, इंद्रजित गुट्टे, अजय फड, विठ्ठल कांबळे, प्रशांत सानप, संदीप मुंडे, दत्ता खंदाडे, गौतम शिंदे, विश्वांभर शिंदे, सायस गुट्टे, केशव दहिफळे, नाथराव खांडेकर आदीजण उपस्थित होते.

Read More  जो डर गया….सो मर गया…. पहा तुफान व्हायरल व्हिडिओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow