लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती बाभळगाव यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधत दि. १८ फेब्रुवारी रोजी बाभळगाव ग्रामपंचायत (चावडी) या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात ७४ शिवप्रेमींनी रक्तदान केले तर आरोग्य शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रक्दान शिबिराची सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिरात ७४ शिवप्रेमीनी रक्तदान केले. तसेच ४७ जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी बाभळगाव ग्रामपंचायत उपसरपंच गोविंद देशमुख, सरपंच प्रतिनिधी सचिन मस्के, सदस्य रामचंद्र थडकर, अनिल मरके, श्रीराम गोमारे व इतर सदस्य तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच लोकनेते विलासराव देशमुख सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती बाभळगावच्या वतीने आज दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मूर्तिपूजन व ध्वजारोहण होणार असून सायंकाळी ५ वाजता बाभळगाव या ठिकाणी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते विलासराव देशमुख सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती बाभळगाव यांच्याकडून देण्यात आली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष मुशर्रफ पठाण, अभिजीत देशमुख, अवधूत मुळे, अभिषेक माने, रोहित देशमुख, अनिकेत देशमुख, मोनेश शिंदे, ओम पिटले, मनोज शिंदे, परमेश्वर देशमुख, रामेश्वर डांगे, श्रीनिवास सगर, साहिल संदूरले यांच्यासह शिवप्रेमीं कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.