26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरजिलेटीनद्वारे बोट उडवली

जिलेटीनद्वारे बोट उडवली

एकमत ऑनलाईन

निलंगा (लक्ष्मण पाटील) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा नदी पात्रात सावरी-मानेजवळगा शिवारामध्ये अवैध मार्गाने वाळू उपसा करण-या वाळू माफियाची बोट तहसीलदार गणेश जाधव यांनी जीलेटीनद्वारे उडवून नष्ट केल्याने दबंग कार्यवाई केल्याने अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

तेरणा व मांजरा नदीपात्रातून खूप मोठया प्रमाणात वाळू उपसा केला जातो. मात्र सध्या नदीपात्रात पाणी असल्यामुळे वाळू उपशासाठी वाळूमाफियांनी शक्कल लढवत तेरणा नदीपात्रात सावरी-मानेजवळगा शिवारामध्ये बोटी मार्फत वाळू उपसा करणारी बोट आणून उपसा सुरू केला होता. याची गुप्त माहिती तहसीलदार गणेश जाधव यांना प्राप्त झाली असता बोटीची चौकशी केली पण नदीपात्रातली बोटीवर कोणीही दावा करीत नव्हता. यामुळे तहसीलदार गणेश जाधव व त्यांच्या पथकाने शनिवार दि. २३ ऑक्टोबर रोजी चारच्या दरम्यान आपल्या पथकासह येऊन ती बोट उध्वस्त करून टाकली आहे. अशाच प्रकारची कारवाई वाळू माफियावर होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. शिवाय तहसीलदार जाधव यांच्या दबंग कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणा-या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

नदी पात्रात पाणी नसताना मोठया प्रमाणात वाळू उपसा झाला. त्यावेळी तहसिलचे महसूल प्रशासन शांत होते. मात्र आज घडीला पाणी असताना केली जाणारी कारवाइ म्हणजे निलंगा तहसिल प्रशासनाचे वारातीमागून घोडे अशीच कारवाई झाल्याची चर्चा होत आहे. तसेच वाळू माफियांनी निलंगा तालुक्यातील अनेक गावात अवैध वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करून त्याची आवाची सव्वा दराने विक्री करून जनतेची लूट करीत असल्याने तहसीलदारांनी तालुक्यातील वाळूसाठयावरही अशा धाडी टाकून कार्यवाई करावी अशी मागणी होत आहे.

महसूल प्रशासनाची कुठे ? माशी शिंकली
देशासह राज्यत कोरोना आजाराने थैमान घातल्याने शासनासह प्रशासन या आजारावर आवर घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते. मात्र या काळात तेरणा नदी पात्रात पाणी नसतांना वाळू माफियांनी नदी पात्रातून सर्व कोरोनाचे नियम धाब्यावर ठेवत सोशल डिशटन्सचे पालन न करता मोठया प्रमाणात अवैध वाळू उपसा केला. त्यावेळेस तालुका महसूल प्रशासनाची कुठे ? माशी शिंकली कुणास ठाऊक, प्रशासन गप्प का ? होते असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे अवैध वाळू माफियांची हिम्मत वाढली असल्याचे चर्चिले जात आहे. आजमितीला तेरणा नदी पात्रात पाणी असतानाही वाळू माफियांनी नवीन शक्कल लढवत बोटीद्वारे अवैध वाळू उपसा करीत असल्याने नागरिकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तहसीलदाराने फोन उचलला नाही
निलंगा तालुक्यातील सावरी-मानेजवळगा शिवारामध्ये अवैध मार्गाने वाळू उपसा करण-या वाळू माफियाची बोट तहसीलदार गणेश जाधव यांनी जीलेटीनद्वारे उडवून नष्ट केल्याच्या संदर्भाने प्रतिक्रीया घेण्यासाठी दै. एकमतचे प्रतिनीधी यांनी तहसिलदार जाधव यांच्याशी संपर्क केला असता तहसिलदार जाधव यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे या घटनेचे गुढ आणखी वाढले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या