30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home लातूर बोरी उमरगा गावच सील

बोरी उमरगा गावच सील

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत आहे. संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या वाढल्याने लातूर तालुक्यातील बोरी उमरगा या गावात एकाच दिवशी २९ व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. गावात मोठया प्रमाणात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने बोरी उमरगा संपूर्ण गावच कंटेनमेंट झोन करून सील करण्यात आले आहे.

लातूर जिल्हयात कोरोना मिटर वेगाने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन केला आहे. लातूर तालुक्यातील बोरी उमरगा येथे पूर्वी ९ रूग्ण पॉझिटीव्ह सापडले होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या दोन टिमने रविवारी १२९ नागरीकांचे स्वॉब तपासले आसता एकाच दिवसी २९ व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे. त्यामुळे संपर्ण गाव कंटेनमेंट झोन घोषीत करून प्रशासनाने सिल केले आहे.

लातूर तालुक्यात आजपर्यंत आरोग्य विभागाने ९१५ स्वॉब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात २८४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यापैकी १२३ कोरोना बाधीतांवर यशस्वी उपचार करून घरी पाठवले आहे. तर १२८ कोरोना बाधीतांवर उपचार करण्यात येत आहेत. तालुक्यात आजपर्यत कोरोना पॉझिटीव्ह निघालेल्या व्यक्तींचा १०९ ठिकाणचा परीसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला होता. सदर झोनमधील रूग्ण बरे झाल्याने ३८ कंटेंटमेंट झोन बंद करण्यात आले, तर सध्या ७१ कंटेंटमेंट झोन चालू आहेत.

कोरोनाने चार जणांचा मृत्यू लातूर तालुक्यात आजपर्यंत २८४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात सेंट्रेल जेल मध्ये ११ व्यक्ती, सीआरपीएफ कॅम्प मधील २९ व्यक्ती, तर मळवटी रोडवरील क्रियेटीव्ह कॉर्टर मधील १५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आजपर्यंत १२३ कोरोना बाधीतांवर यशस्वी उपचार करून घरी पाठवले आहे. तर १२८ कोरोना बाधीतांवर उपचार करण्यात येत आहेत. लातूर तालुक्यातील साई, कासारगाव, म्हाडा कॉलनी बाभळगाव, चिंचोलीराव या गावातील प्रत्येकी एक व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी
लातूर तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी टिम तयार करण्यात आल्या आहेत. ज्या गावात कोरोनाचा रूग्ण सापडत आहे. अशा कंटेन्टमेंट भागातील हायरिस्क नागरीकांचे आरोग्य विभागाची टिम स्वॉब घेत आहे. नागरीकांनी स्वत:हून आजाराचे कांही लक्षणे असतील तर तपासणी करून घ्यावी. कोणातही आजार अंगावर काढू नये. नागरीकांनी नियमित हात धुवावेत. तोंडाला मास्क वापरावा, हात सॅनिटायझरने धुवावेत. बाहेर कामा निमित्त पडलाच तर गर्दीत जाणे टाळावे. खोकला, शिंक, ताप येत असल्यास आरोग्य विभागात जाऊन तपासणी करावी. ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे शरिरात अशक्तपणा येतो. त्यासाठी नागरीकांनी स्वत: होऊन आरोग्य तपासणी करण्याचे आहवान लातूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक सारडा यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या