29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeलातूरजळकोट तालुक्यातील लसीकरणाला ब्रेक

जळकोट तालुक्यातील लसीकरणाला ब्रेक

एकमत ऑनलाईन

जळकोट : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कोरोना प्रतिबंधात्मक लस नागरिकांनी घ्यावी यासाठी प्रयत्नशील आहे परंतु या लसीकरण मोहिमेला कोरणा प्रतिबंधात्मक लस संपल्यामुळे ब्रेक लागत आहे . जळकोट तालुक्यात सध्या अनेक रुग्णालयात लसीचा साठा संपला आहे तसेच ज्या काही रुग्णालयात लसीचा साठा आहे तो एक दोन दिवसात संपणार आहे . अनेक रुग्णालयातील लस संपल्यामुळे लसीकरण ठप्प झाले आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना महामारीचा फैलाव झालेला आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये कोरोना महामारी पसरली होती यामुळे लाखो लोकांचा बळी गेला होता. यानंतर संपूर्ण जगामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्मितीसाठी तयारी सुरू झाली. जगामध्ये अनेक ठिकाणी लस तयार झाली. भारतातही पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटमध्ये कोवीशील्ड लस तयार झाली . तर हैदराबादमध्ये भारत बायोटेक कंपनीमध्ये कोवॅकसीन लस तयार झाली . यानंतर भारतामध्ये सुरवातीला साठ वर्षाच्या वरील वयोगटातील सर्व नागरिकांना लस दिली गेली. यामध्ये काही जणांनी भीतीपोटी लस घेतली नाही. यापाठोपाठ पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना ही लस देण्यात आली. आता भारत सरकारने १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

सरकारने अठरा वर्षावरील सर्वांना प्लस देणार असल्याचे जाहीर केले आणि अनेक दवाखान्यामध्ये लस नसल्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला आहे.जळकोट येथीलग्रामीण रुग्णालयांमध्ये कोवीशील्ड की लस तीन दिवसापासून संपलेली आहे. आणखीन एक ते दोन दिवस ही लस येणार नाही असे येथील कर्मचा-यांनी सांगितले.

या ठिकाणी दुसरा डोस घेण्यासाठी अनेक नागरिक येत आहेत परंतु येथे आल्यावर लस संपल्याचे सांगितले जात आहे. तसेच जळकोट तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील भारत बायोटेक कंपनीची लस संपलेली आहे.वांजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गत चार दिवसापासून कोणत्याही कंपनीची लस नाही. यामुळे येथील लसीकरण ठप्प झाले आहे. तसेच आतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवॅक्सीन ही लस आहे परंतु ही लस देखील एक-दोन दिवसांमध्ये संपणार आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यातील लसीकरण एक-दोन दिवसात ठप्प होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात १ हजार ३७२ व्यक्ती कोरोना बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या