27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरराजर्षी शाहू महाविद्यालयाचे उज्­ज्­वल यश

राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उज्­ज्­वल यश

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
एच. एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च २०२२ च्­या निकालामध्­ये येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्­या कला, वाणिज्­य व विज्ञान शाखेच्­या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून निकालाची उज्­ज्­वल परंपरा कायम राखलेली आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल ९९.९१ टक्­के असून १२ विद्याथ्र्­यांनी ९० टक्­केपेक्षा अधिक गुण मिळविले असून ८५ टक्­के पेक्षा अधिक गुण मिळविणारे ७८ विद्यार्थी तर ८० टक्­केपेक्षा अधिक गुण मिळविणारे २०९ विद्यार्थी, ७५ टक्­केपेक्षा अधिक गुण मिळविणारे ४०१ विद्यार्थी आहेत. कला शाखेचा निकाल ९१.१८ टक्­के असून कला शाखेत ८५ टक्­क्­यंपेक्षा अधिक गुण घेणारे ९ विद्यार्थी आहेत.

तसेच कला शाखेत ४४ विद्यार्थी विशेष प्राविण्­यासह तर १४७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्­तीर्ण झाले आहेत. वाणिज्­य शाखेचा निकाल ९७.२३ टक्­के असून या शाखेत ९० टक्­के पेक्षा अधिक गुण घेणारे १३ विद्यार्थी आहेत तर ८५ टक्­क्­यांपेक्षा अधिक गुण घेणारे ५१ विद्यार्थी आहेत. वाणिज्­य शाखेत २०६ विद्यार्थी विशेष प्राविण्­यासह तर ४३७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्­तीर्ण झाले आहेत. एच.एस.सी. व्­होकेशनल शाखेत १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्­तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून कु.मुग्­धा मिंिलदराव कुलकर्णी, ही विद्यार्थीनी ९३.३४ टक्­के गुणांसह महाविद्यालयातून सर्वप्रथम आली आहे. कु.भारती विष्­णू चव्­हाण ही विद्यार्थीनी ९३.१७ टक्­के गुण प्राप्­त करुन सर्वद्वितीय आली आहे आणि सिध्­दनाथ बिभीषण कुदाळे व कु.पूजा संजय मानकरी दोघेही ९२.१७ टक्­के गुणासह सर्वतृतीय आले आहेत.

अनुसूचित जाती संवर्गातून कु.सांची सदाशिव शिंदे ९१.५० टक्­के व अनुसूचित जमाती संवर्गातून कु.संजना सायलू बसलवार ८४.३४ टक्­के गुण प्राप्­त करुन महाविद्यालयातून प्रथम आले आहेत. कला शाखेतून महाविद्यालयातून कु.राजनंदिनी राजेश कुचमे ही इंग्रजी माध्­यमाची विद्यार्थीनी ९२.८३ टक्­के गुण घेऊन सर्वप्रथम आलेली आहे. कु.सानिया मेहमूद शेख ही ९१.६७ टक्­के गुण घेऊन सर्व द्वितीय क्रमांकाने उत्­तीर्ण झाली आहे. वाणिज्­य शाखेतून मंत्री प्रणव बलराम हा विद्यार्थी ९५.३३ टक्­के गुणांसह सर्वप्रथम आलेला आहे. तर कु.वरदा शैलेंद्र आपटे ही विद्यार्थीनी ९४.५० टक्­के गुण घेऊन सर्वद्वितीय आली आहे. तसेच कु.श्रुती रविकुमार निटुरे ही विद्यार्थीनी ९३.८३ टक्­के गुण घेऊन सर्वतृतीय आली आहे.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांंचे शिव छत्रपती शिक्षण संस्­थेचे अध्­यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्­यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुध्­द जाधव, सहसचिव अ‍ॅड. सुनिल सोनवणे, सहसचिव गोपाळ शिंदे, सदस्­य डॉ. आर. एल. कावळे, सीईटी सेल शालेय समितीचे अध्­यक्ष डॉ. सुहास गोरे, सीईटीसेल संचालक प्रा. दिलीप देशमुख, इतर सर्व संस्­थाचालक, महा­विद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्­हाणे, उपप्राचार्य प्रा.सदाशिव शिंदे, उपप्राचार्या सुचेता वाघमारे, पर्यवेक्षक प्रा. संजय बिराजदार, इतर सर्व समन्­वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या