30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeलातूरचार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

एकमत ऑनलाईन

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे सतत दुर्लक्ष होत आहे. आता बोटावर मोजण्याइतके ग्राहक उरले आहेत. त्यांनाही बीएसएनएल चांगली सुविधा देत नाही. जळकोट तालुक्यातील बीएसएनएल सेवा गत चार दिवसांपासून बंद असल्यामुळे तालुक्यातील बीएसएनएल ग्राहकांचे मोबाईल केवळ खेळणी बनले आहेत. अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचा-यांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बीएसएनएलवर प्रेम करणारे अनेक ग्राहक वर्ग आहेत. दुस-या किती खाजगी कंपन्या आल्या आणि किती सुविधा दिल्या तरीही अनेक जण बीएसएनएलचे सिम कार्ड वापरतात. या बीएसएनएलची जळकोट तालुक्यामध्ये जरी सेवा चांगली नसली तरी अनेक जण बीएसएनएल सिम कार्ड वापरतात. जळकोट मध्ये बीएसएनएलची वर्षभरापूर्वी ४ जी सेवा सुरू झाली. यामुळे काहीतरी सुधारणा होईल असे वाटत होते. तसेच ग्राहकांना चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा आता फोल ठरत आहे.

दररोज थोडा वेळ तरी बीएसएनएलची सेवा खंडित होत आहे. जळकोटचे ग्राहक थोडया वेळेच्या खंडित सेवेला समजून घेतात्. परंतु जर चार-चार दिवस मोबाईल सेवा बंद असेल तर याला काय म्हणावे असा प्रश्न बीएसएनएलच्या ग्राहकांना पडला आहे. शुक्रवारपासून बीएसएनएल सेवा बंद पडली आहे. जळकोटमध्ये बीएसएनएल ऑफिस आह.े परंतु या ठिकाणी कुठलाच अधिकारी राहत नाही. तालुक्याचा कारभार उदगीरहून हाकला जात आह. यामुळे जळकोट मध्ये काय होत आहे हे बीएसएनएलच्या अधिका-यांना कसे कळणार.

जळकोटमध्ये अनेक खाजगी कंपन्या आहेत की त्या चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. जळकोट येथील टेलिफोन एक्सचेंज ऑफिसला उदगीरहून ओएफसी आली होती. परंतु उदगीर ते जळकोट राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वायर फुटले. यामुळे ही सेवा खंडित झाली. यानंतर शिरूर ताजबंद ते जळकोट एक ओएफसी लाईन आली होती. त्या लाईनला कनेक्शन घेण्यात आले होते. मात्र जांब ते जळकोट या दरम्यान रोडच्या खोदकामाचे काम सुरू आहे. यामुळे जळकोटची सेवा खंडित झाली असावी असा कयास बांधला जात आहे.

तसेच शिरूर ताजबंद येथे काही बिघाड झाल्यास जळकोटची सेवा बंद होते. गत सहा महिन्यांपासून असेच सुरू आहे. परंतु याकडे लक्ष देण्यास अधिका-यांना वेळ नाही.खाजगी मोबाईल कंपन्यांचे वायर देखील तुटतात. परंतु ते तास-दोन तासांमध्ये दुरुस्ती करतात. परंतु चार-चार दिवस बीएसएनएलची मोबाईल सेवा बंद असून देखील, अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचा फटका बीएसएनएल सिम कार्ड असणा-या ग्राहकांना बसत आहे. अनेक सरकारी कर्मचारी असे आहेत की ते बीएसएनएल कार्ड वापरतात. परंतु गत चार दिवसांपासून फोन बंद असल्यामुळे त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आता ग्रॅच्युइटी पाच वर्षाऐवजी एका वर्षात मिळू शकते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या