लातूर : प्रतिनिधी
शहरातील प्रत्येक नगरातील असलेल्या बुद्ध विहारांमध्ये भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी भेट देवुन बुध्द वंदना चालु करणे, विहार स्वच्छता आणि धार्मिक व नैतिक संस्कार समाजातील जनमाणसावर रुजविण्यासाठी विशेषत: तरुण युवा वर्गास धम्माकडे प्रेरित करुन समाजातील प्रत्येक जन संस्कारीत होण्यासाठी येथील तक्षशीला बुद्ध विहारातून बुद्ध वंदना अभियानास प्रारंभ झाला.
यावेळी धम्म देसना देताना पू. भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की, शहरातील प्रत्येक नगरातील बौद्ध समाजाने बुध्द विहाराचे महत्व जाणून बुध्द विहाराची निर्मिती करणे काळाची गरज आहे. भारतातून बौद्ध वृक्ष सुकला असेल तरी त्याचे मूळ अजून सुकले नाही त्याला जर खत-पाणी घातले तर पुन: नव्याने पालवी फुटेल. त्याच अनुषंगाने बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व बौद्ध धम्माचा वृक्ष या भारताच्या मूळ भूमीत पुन्हा उभा केला. यावेळी त्रिशरण पंचशील, त्रीरत्न वंदना, २२ प्रतिज्ञा व संविधान प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन, धम्मदेशना आदी कार्यक्रम झाले. तसेच यावेळी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांचेही मार्गदर्शन झाले. धम्मपालन गाथा, आशीर्वाद आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सुत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले तर सचिन मंडाले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्षय धावारे, अविनाश आदमाने, असलम शेख, अविनाश डुमने, ओंकार घनघावकर, निलेश बनसोडे, विशाल वाव्हुळे, सतिश कांबळे, समाधान आचार्य, सतीश मस्के, उदय सोनवणे, अनिरुद्ध बनसोडे, मिंिलद धावारे आंदीनी प्रयत्न केले. यावेळी राहुलनगर परिसर व लातुर शहर परीसरातील उपासक-उपासिका आणि बौध्द जन मोठ्या संख्येने उपस्थित होते.