22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूररुग्णालयाच्या ठिकाणी गतीने ऑक्सिजन प्लांट उभारा

रुग्णालयाच्या ठिकाणी गतीने ऑक्सिजन प्लांट उभारा

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसात कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट होत असली तरी नव्याने बाधीत होवुन येणा-या रुग्णांना वेळेत चांगले उपचार मिळण्याच्या दृष्टीने तसेच सभाव्य तिसरी लाट आली तरी तिचा जिल्ह्यात कमीत कमी प्रभाव रहावा यासाठी सज्ज राहावे, शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणीला गती द्या, ऑक्सिजन तसेच व्हेंन्टिलेटर बेडची संख्या वाढवावी, लहान मुलासाठी स्वतंत्र विशेष कक्षाची उभारणी करावी, सभाव्या संकटासाठी सर्व प्रकारच्या औषधांची उपलब्धता करून ठेवावी असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

लातूर जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित रुग्णावर तत्पर, प्रभावी उपचाराच्या अनुषंगाने आवश्यक असणारे व्हेंन्टिलेटर्स, ऑक्सिजन, रेमडीसीवीर, इतर औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता व पुरवठा या बाबतीत आज मंत्रालयात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बुधवार दि. १२ मे रोजी दुपारी लातूर जिल्ह्यातील प्रमुख वरीष्ठ अधिका-यांशी संवाद साधून आढावा घेतला. सदरील बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख आदी सहभागी झाले होते.

ऑक्सिजन प्लांटचे काम लवकरात लवकर सुरु करावे, शहराप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात व्हेंन्टिलेटरची सुविधा उभारावी या व्हेंटिलेटर वापरा संबंधी कर्मचारी यांना प्रशिक्षीत करावे, लसीकरण केंद्रावर गर्दी होवु नये यासाठी ही मोहिम सुलभपणे राबवावी आदी सुचनाही पालकमंत्री देशमुख यांनी योवळी दिल्या आहेत. लातूर शहरात मागच्या १० दिवसात रुग्णसंख्येत सातत्यांने घट होत आहे. कोवीड केअर सेंटर मधील सुविधामध्ये सुधारण करण्यात येत आहेत. शहरातील टेस्टींगचे प्रमाणही वाढवण्यात येईल असे महापालीका आयुक्त अमन मित्तल यांनी सांगितले.

जिल्हयात कडक लॉकडाऊन अंमलबजावणीमुळे रूग्णसंख्येत घट झाली आहे. आगामी काही दिवस अशी परिस्थिती हाताळण्यात येईल. आगामी पेरणीचे दिवस आणि शैक्षणिक वर्ष सुरु होण्याची वेळ या दरम्यान कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये याची दक्षता घेतली जाईल असे जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी यावेळी सांगितले. रुग्णसंख्येत घट होत असल्याने आता विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेच्या कोवीड डेलीकेटेड रुग्णालयात किमान १०० बेड शिल्लक राहत आहेत असे सांगून आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट आली तरी त्यासाठी रुग्णालय सज्ज ठेवण्यात येत आहे असे अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी सांगितले. सुपरस्पेशालीटी व वैदयकीय महाविदयालय या ठिकाणी प्रत्येकी दोन या प्रमाणे एकुण ४ ऑक्सिजन प्लांट उभारावेत, लहान मुलासाठी विशेष कक्ष उभारण्यात येत असून त्या ठिकाणी काही व्हेन्टिलेटरची आवश्यकता असल्याचे नमुद केले.

ऑक्सिजनचा नियमीत पुरवठा
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी एकुण कोरोना प्रादूभावाची सदयस्थिती औषधाची उपलब्धता लॉकडाऊनची अंमलबजावनी या संदर्भाने माहिती दिली. जिल्ह्यात मागच्या तीन-चार दिवसांत सातत्यांने रुग्णसंख्येत घट होत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा नियमीत सुरु होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी आणि पुरवठा यातील तफावतही कमी झाली असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील ३०रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनीही जिल्हयाच्या ग्रामिण भागात रूग्णसंख्येत घट होत असजी तरी काही तालुक्यात मात्र अदयाप रूग्णसंख्या वाढत असल्याचे म्हटले आहे. आरोग्य यंत्रणे मार्फत जनजागृती आणि लॉडाऊनची प्रभावी अंमलबजावनी याव्दारे कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुस-या लाटेत अमरावती जिल्हयात कमी झालेली रूग्णसंख्या पून्हा असल्या बाबतची माहिती घेतली जात असुन त्या मागचा कारणेही जाणून घेतली जातील व लातूर जिल्हयात तशी परिस्थिती उदभवू नये त्यांची काळजी घेतली जाईल असे सांगितले.

ऑक्सिजन निर्मितीसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन देणार-राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या