24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्याचा भार २८ पोलिसांवर

जळकोट तालुक्याचा भार २८ पोलिसांवर

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट पोलीस ठाण्यात ५३ पदांना मंजुरी आहे. यामध्ये १ पोलीस निरिक्षक , १ सहाय्यक पोलिस उप निरीक्षक, २ महिला कॉन्स्टेबल, ४९ पोलीस कर्मचारी, अशा ५३ पदांना मंजुरी आहे. या मंजुरी प्रमाणे जळकोट पोलीस ठाण्यात पोलीस कार्यरत असणे गरजेचे आहे परंतु जळकोट पोलीस ठाण्यात केवळ मंजुरीपेक्षा अर्धेच कर्मचारी आहेत. यामध्ये1 पोलिस निरीक्षक1 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 3 पोलीस नाईक, १० हवालदार, ७ पोलीस कॉन्स्टेबल, ३ महिला कॉन्स्टेबल, असे एकूण २८ पोलीस कर्मचारी पोलीस कार्यरत आहेत.

जळकोट पोलीस ठाणे अंतर्गत वडगाव, चेरा, वांजरवाडा, होकरना, उमरदरा, चाटेवाडी, स्वर्गा, केकत सिंदगी, विराळ, धामणगाव, हावरगा जिरगा डोमगाव, शेलदरा, जगळपुर , ढोरसांगवी, मंगरूळ, बोरगाव, लाळी बुद्रुक, लाळी खुर्द, एवरी, सोनवळा, करंजी, धनगरवाडी, कोनाळी डोंगर, डोंगरगाव, शिवाजीनगर तांडा, पाटोदा खुर्द, पाटोदा बुद्रुक कोळनुर, जंगमवाडी, कुणकी, अतनूर, हळदवाढवणा, रावणकोळा, बालाजी तांडा, देवनगर तांडा, रामचंद्र तांडा, आतनूर तांडा, गव्हाण, मेवापूर, शिवाजीनगर तांडा, वाघमारे तांडा, डोंगरेवाडी तांडा, मरसांगवी, फकरू तांडा, चतुरा तांडा , पोमातांडा तर घोनसी पंचायत समिती गणांमध्ये एकुर्का खुर्द, तिरुका, सुल्लाळी , भवानीनगरतांडा, मेघातांडा, रावजीतांडा, थावरु तांडा, गुत्ती, रामपूरतांडा, धर्मातांडा, अग्रवालतांडा, रुपलातांडा, घोणसी, धोंडवाडी, खंबाळवाडी, घोणसीतांडा या ४७ गावे , पाच वाड्या व अठरा तांड्या साठी केवळ २८ कर्मचारी जळकोट पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

एकंदरीत गावांची संख्या अधिक व पोलिसांची संख्या कमी यामुळे सहाजिकच उपस्थित असलेल्या कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा ताण येणे सहाजिक आहे. एखाद्यावेळेस एकाच वेळी जास्त गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली तर अशा प्रसंगी मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जळकोट पोलिस ठाण्यात मंजूर असलेले पदे आहेत तेवढे भरावेत अशी मागणी होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या