23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरघरफोडीतील आरोपी दागिने, रोख रकमेसह अटकेत

घरफोडीतील आरोपी दागिने, रोख रकमेसह अटकेत

एकमत ऑनलाईन

निलंगा : औराद शहाजानी येथील एक व्यापारी दि.२३ जुलै २०२२ रोजी त्यांचे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. तेव्हा घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ७ लाख २६,७०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती.
आहे. वरिष्ठ अधिका-यांनी अज्ञात आरोपींच्या शोध घेण्यासाठी पोलीस पथक नेमून तपासाबाबत सूचना देऊन तपासाची चक्रे फिरवली आणि गोपनीय माहितीच्या आधारावरून मोठ्या शिताफीने आरोपी बबलू उर्फ अमजद रजा शकील बेलोरे (वय २० वर्ष), सोहेल तैमूर पटेल, (वय २१ वर्ष), इम्रान खलीलमियां कासार बेलूरे (वय १९ वर्ष) सर्व राहणार सिंधी गल्ली, औराद शहाजानी (ता. निलंगा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुल केले व गुन्ह्यात चोरलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम ५०, हजार रुपये असे एकूण ७ लाख २६, ७०० रूपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. या आरोपीताकडून अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आणखीन घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, औराद शहाजानीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी कौशल्य पूर्वक घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून अवघ्या २४ तासांत गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच औराद शहाजानी पोलिसांनी मागील तीन दिवसात चोरी व घोरपडीच्या गुन्ह्याचा तपास लावून एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी पोलीस ठाणे येथे गुरनं १५४/२०२२ कलम ४५७, ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पोउपनि गोपाळ शिंंदे, पोलीस अंमलदार स्वरूप धुमाळ, गोपाळ बरडे, श्रीनिवास चिटबोणे, मनोजकुमार मोरे, लतीफ सौदागर, तानाजी टेळे, विश्वनाथ डोंगरे, रवींद्र काळे ,अली शेख, महिला पोलीस आमदार भाग्यश्री माळकर, भाग्यश्री ठोकरे, भाग्यश्री गिरी यांनी केली आहे. बाहेरगावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तू दागिने रोख रक्कमेची सुरक्षितेची काळजी घ्यावी. तसेच आपले दुकानातील कामगारांची चारित्र्य पडताळणी करूनच कामावर ठेवावे, असे आवाहन औराद शहाजानी पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या