34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरशिरुर ताजबंद परिसरातील दहा एकर ऊस जळून खाक

शिरुर ताजबंद परिसरातील दहा एकर ऊस जळून खाक

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : या तालुक्यातील शिरूर ताजबंद थोरले वाडी परिसरातील बुधवारी दुपारी १.४५ वाजता शॉटसर्किटने थोरलीवाडी व शिरुर ताजबंद येथील पाच शेतक-यांचा ऊस व दोन शेतक-यांचे प्रिंक्लर पाईप,ठिबकंिसचन च्या नळ्या जळून खाक झाल्या आहेत. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद शिवारातील एकूण पाच शेतक-यांच्या शेतीतील उभ्या असलेल्या ऊसाला बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागली असता अग्नीने रौद्ररुप धारण केल्याने शिवारात भितीचे वातावरण पसरले होते.

या आगीत सुधाकर तुकाराम फुलमंटे एक हेक्टर, सचिन प्रकाश वलसे १.४० हेक्टर, (या. थोरलीवाडी) यांच्या शेतीला लागून असलेले पद्मीनबाई ज्ञानोबा वाढवणकर १.२० हेक्टर, अरंिवंद तुकाराम फुलमंटे १.४८ हेक्टर व गोंिवद व्यंकट वलसे ०.३२ हेक्टर (रा.शिरुर ताजबंद) अशा एकूण पाच शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला. सचिन वलसे आणि अरंिवंद फुलमंटे यांच्या शेतीतून वीज वितरण कंपनीच्या तारा गेल्या आहेत. यामुळे आग लागली असावी असे शेतक-यांचे म्हणणे आहे. ऊसाला लागलेली आग पाहता पाहणा-याच्या तोंड चे पाणी पळाले.

यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम भोसले यांनी तात्काळ अहमदपूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण करून पाण्याचे टॅकर बोलाऊन आग नियंत्रणात आणली. मात्र शेजारी असलेल्या दैवशाला अशोक फुलमंटे व बालाजी दिलीप वलसे या दोन शेतक-याच्या ड्रीपच्या नळ्या व ्िप्रक्लचे पाईप जळुन खाक झाले आहेत. शिरुर ताजबंद सज्जा चे तलाठी नवनीत जामनिक यांनी पंचनामा केला आहे. काही दिवसांतच हा ऊस साखर कारखान्याला जाणार होता आणि शेतक-यांनी वर्षेभर केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार होते परंतु या आशेवर पाणी फिरले आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदरील स्थळास व शेतक-­यांना भेट देऊन धीर देत शासनाकडून मदत देता येत असेल तर प्रयत्न करू असे जिल्हा परिषदे गटनेते मंचकराव पाटील, सुरज पाटील, यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम भोसले, प्रशांत पाटील,चेअरमन दिलीप वलसे, दत्ताभाऊ जवळगे, आदी उपस्थित होते.

‘ब्लू इकॉनॉमी’चे फायदेशीर मॉडेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या