26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूररेणापूर तहसीलसमोर शेंगा नसलेल्या सोयाबीनचे दहन

रेणापूर तहसीलसमोर शेंगा नसलेल्या सोयाबीनचे दहन

एकमत ऑनलाईन

रेणापूर : तालुक्यातील कारेपूर महसूल मंडळात झालेली अतिवृष्टी, गोगलगायींच्या प्रादुर्भाव व मोजॅक व्हायरसमुळे सोयाबीनचे नुकसान झाले असून या प्रमाणात पिकाचे सरसकट पंचनामे करावेत व शेतक-यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी यासह अन्य मागणीसाठी शुक्रवारी (दि. २३ .सप्टेंबर) तहसील कार्यालयासमोर शेंगा नसलेले सोयाबीन जाळून घोषणा देत किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-याांसह आंदोलन करण्यात आले.

रेणापूर तालुक्यात सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर गोगलगायींचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान झाले. गोगलगायीमुळे या भागातील शेतक-याना दुबार तिबार पेरणी करावी लागली. शिवाय मागील एक दीड महिन्यापासून कारेपूर महसूल मंडळात सतत पाऊस पडत गेला. तालुक्यातील पाच महसूल मंडळांपैकी कारेपूर महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. या पावसाने उरले सुरले सोयाबीनही वाया गेले. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे या मंडळातील सोयाबीनचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबीनला पीक विमा लागू झाला होता.

यात रेणापूर महसूल मंडळाला प्रति हेक्टर ११ हजार ८०० रुपये,कारेपूर मंडळ ५ हजार ५०० रुपये, पानगाव मंडळ २ हजार २०० रुपये प्रति हेक्टर दराने सरसकट मंजूर झाला होता परंतु अद्यापपर्यंत शेतक-यांच्या बॅक खात्यावर जमा झालेला नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात किसान सेनेचे जिल्हा सचिव राजकुमार नागरगोजे, तुकाराम वल्ममपल्ले, नवनाथ गाडे, गयाबाई आरदवाड, महेबूब शेख, अजय दाडगे, गंगाधर साळुंके, गुलाब जाधव, अविनाश कापसे, मधुकर बरूरे, गुलाब चव्हाण, मोहन कांबळे, ज्ञानोबा डोंगरे यासह कारेपूर महसुल मंडळातील शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या