16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeलातूरबसगाडी जुनी भाडे मात्र जास्तीचे, प्रवाशातून संताप

बसगाडी जुनी भाडे मात्र जास्तीचे, प्रवाशातून संताप

एकमत ऑनलाईन

चाकूर : प्रतिनिधी
चाकूर बसस्थानकातून लातूर-अहमदपूर येणा-या व जाणा-या एशियाड गाडया मात्र जुन्या झाल्या असून भाडे मात्र नव्या को-या सुपरफास्ट गाडीसारखे जास्तीचे आकारले जात असल्यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. चाकूर हे तालुक्याचे ठिकाण असून या तालुक्यातील ब-याच प्रवाशांची मोठया संख्यने लातूर, अहमदपूर, नांदेडकडे ये-जा असते. पण या एशियाड नावाच्या ज्या जुन्या गाडया आहेत. त्या गाडयांच्या भाडयात मात्र मोठी तफावत असल्याचे प्रवाशातून बोलून संताप व्यक्त केला जात आहे. या गाडीला चाकूर, अहमदपूर जाण्यासाठी प्रवाशांना तब्बल ५५ रुपये मोजावे लागतात. तर त्याही पेक्षा चांगल्या बसगाडीने अहमदपूर, चाकूरसाठी चाळीस रुपये मोजावे लागतात.

तब्बल १५ रुपयाची तफावत असल्यामुळे या गाडीच्या भाडयासाठी प्रवाशातून मोठया प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. या गाडया जुन्या झाल्या असून या गाडयांमध्ये प्रवासी आगाऊ तिकीटामुळे बसायला तयार नसतात. पण कांहीजन थांबून ताटकळण्यापेक्षा ना विलाजास्तव या गाडीने प्रवास करीत असताना तिकीटाचे आगाऊ पैसे मोजावे लागल्याचे लक्षात येताच गाडी जुनी आणि भाडे मात्र जास्त यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त केला जातो. या जून्या एशियाड गाडया चालवायच्या असतील तर भाडे मात्र इतर गाडी प्रमाणेच घ्यावे लागेल, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या