34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरलातुरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद

लातुरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानूसार निर्गमित केलेल्या नियमावलीनूसार दि. ६ एप्रिल रोजी लातूर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद होते. सकाळच्या सत्रात काही काळ महापालिका व पोलीस पथकाने शहरात फे रफटका मारुन अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी दि. ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून सुरु झाली. त्याअन्वये रुग्णालये, डायग्नोसीस सेटर, क्लिनिक, वैद्यकीय, विमा कार्यालये, मेडिकल स्टोअर्स, फार्मास्यूटीकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा सामान, भाजीपाला दुकाने, दुध विक्री, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने, चिकन, मटन, अंडी दुकाने, सार्वजनिक परिवहन, रेल्वे, ऑटोरिक्षा, अधिकृत टॅक्सी, सार्वजनिक सरकारी, खाजगी बसेस, पेट्रोल पंप, एल. पी. जी. गॅस, पंक्चर दुकाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी अत्यावश्यक सेवा म्हणून निर्धारित केलेल्या सेवा सुरु ठेवण्यात आलेल्या आहेत.

या व्यतिरिक्त जी दुकाने, आस्थापना सुरु होत्या त्या आस्थापना पोलीस निरीक्षक संजय हिबारे, महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे व त्यांच्या पथकाने गंज गोलाई, सुभाष चौक, कापड लाईन, हनुमान चौक, गांधी चौक आदी फे रफटका मारुन अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद केली.

जिल्ह्यात १0६२ नवे कोरोना रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या