16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeलातूरसद्गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते डॉ. राम बोरगावकर यांचा सत्कार

सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते डॉ. राम बोरगावकर यांचा सत्कार

एकमत ऑनलाईन

लातूर : नुकतेच बनारस क्षेत्री जाऊन संगीत महायज्ञाचे आयोजन करुन आपल्या ४० शिष्यासह आणि ५० रसिक श्रोत्यांसह बनारस येथे जावून हा संगीत महायज्ञ अतिशय उत्साहात यशस्वी केल्याबद्दल पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष संत श्री ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी तालमणी डॉ. राम बोरगावकर यांचा सत्कार केला.

याप्रसंगी त्यांनी आपण बनारस येथे जाऊन हा संगीत महायज्ञ यशस्वी करुन महाराष्ट्रातील कलाक्षेत्राची शान आणि मान उंचावली. असेच सत्कार्य यापुढेही आपल्या हातून घडावे असे गौरवोद्गार काढले व आशीर्वाद दिले. असा संगीत महायज्ञ महाराष्ट्रातून बनारस येथे पहिल्यांदाच घडला. तसेच डॉ. राम बोरगावकर यांचे घराणे बनारस असल्याने या घराण्याची गुरुविद्या बनारस येथे गुरुग्रही आपल्या ४० शिष्यासह तालमंत्राचे जप करून अर्पण केली. ‘तेरा तुझे अर्पण, क्या लागे मेरा’ हा समर्पण भाव त्यांच्या गुरु सेवेमध्ये होता. याप्रसंगी प्रा. गणेश बोरगावकर, प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी व अनेक रसिक उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या