23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरअंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करा

अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करा

एकमत ऑनलाईन

लातूर : अंतिम वर्षाच्या परीक्षेला रद्द या मागणीचे निवेदन लातूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविले आहे.

कोविड-१९ या महामारी काळात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे योग्य होणार नसून कोरोना व्हायरस संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या भारतात दिवसेेंदिवस वाढत आहे़ महाराष्ट्रातीलही कोरोना रुग्णांची संख्या लक्षणिय आहे़ संपूर्ण देशात विशेषत: महाराष्ट्र राज्यात पसरलेल्या कोरोनाचे प्रमाण पाहता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना परीक्षा देणे योग्य आणि सुरक्षित नाही तसेच आॅनलाईन परीक्षा घेणे अत्यंत भेद भावपूर्ण असेल कारण भारतात बºयाच ठिकाणी दुर्गम भागात आॅनलाइन परीक्षाची सोय नाही व गरीबांमध्ये भेदभाव केला जाईल.

तसेच लॉकडॉऊनमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून या विषयावर कोणतेही स्पष्टीकरण नव्हते आणि ते परीक्षेला येण्यास सकारात्मक मूडमध्ये नाहीत. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा या रद्द कराव्यात असे लातूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने भारताचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जिल्हाअधिकाºयांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे, उपाध्यक्ष अभिषेक पतंगे, सरचिटणीस गोविंद आलुरे, प्रभाग ११ चे प्रभाग अध्यक्ष विकास कांबळे, सोशल मीडिया प्रमुख सुनील वाळे उपस्थित होते.

Read More  आता घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या