18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरश्रध्दा वाळकर खुन प्रकरणी उदगीरात कॅण्डल मार्च

श्रध्दा वाळकर खुन प्रकरणी उदगीरात कॅण्डल मार्च

एकमत ऑनलाईन

उदगीर : दिल्ली येथील श्रद्धा वाळकर खून प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात दिसून येत आहेत. अत्यंत निघृण पद्धतीने केलेल्या या खुनाच्या आणि महिलांवर होणा-या गुन्ह्यांच्या विरुद्ध उदगीर येथील प्रयास चळवळीच्या तरुणांनी दि. १६ नोव्हेंबर २२ रोजी निषेध नोंदविण्यासाठी कॅण्डल मार्च काढला. दिवंगत श्रद्धा वाळकरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ श्रद्धांजली अर्पण करुन अपराध्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून व्यवस्थेला आवाहन करण्यात आले. तपास यंत्रणा व न्याय व्यवस्था आपले कर्तव्य चोख पद्धतीने पार पाडेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करून कॅन्डेल मार्च काढण्यात आला.

उदगीर शहरातील नागरिकांनी या कॅन्डेल मार्च मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाज माध्यमातून सदर घटनेची विकृत चिकित्सा होत असताना उदगीरकरांनी सामाजिक सद्भावना दाखवत केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी डॉ. अंजुम खादरी, सौ. ज्योती डोळे, उत्तरा कलबुर्गे, भारती, ज्योती स्वामी यांच्यासह शहरातील पन्नास महिला सहभागी झाल्या. प्रयास चळवळीच्या वतीने अ‍ॅड.नरेश सोनवणे,ओंकार गांजुरे,अहमद सरवर,अजित शिंदे, निखिल मोरे, जशन डोळे, शिवकुमार जाधव, श्रीनिवास एकुरकेकर, श्रीकांत शिंदे, अजय डोणगावकर, आशिष राजूरकर, नवाज मुंजेवार, फेरोज देशमुख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास मोतीलाल डोईजोडे, गजानन सताळकर, रविकिरण हसरगुंडे, धनंजय गुडसूरकर, कैलास येसुगे, दाईमी अजीम , समीर शेख, शेख अखिल मियां मौलाना नौशाद,अमोल घुमाडे,धनाजी बनसोडे, शंकर मुक्कावर,बापू कांबळे,अजित कांबळे,अजिज पटेल, शेख गौस,आशीष ठाकूर, संदीप पाटील,ईश्वर समगे, यशवंत पाटील सद्दाम बागवान, अजमत खान आदी मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या