34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूररेमिडीसेवर इंजेक्शन उपलब्धतेची दक्षता घ्यावी

रेमिडीसेवर इंजेक्शन उपलब्धतेची दक्षता घ्यावी

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरातील वाढत्या कोरोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौर, उपमहापौर यांनी मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत शहरातील संपूर्ण कोरोना कामकाजाचा आढावा घेतला. शहरात रेमिडीसिवर इंजेक्शन सुलभरित्या उपलब्ध होण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या तसेच खाजगी तपासणी केंद्र केंद्रामधून सिटीस्कॅन, आरटीपीसीआर, अँटीजन चाचणी शासन मान्य दरानेच केल्या जात असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या.

लातूर शहरात झपाट्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दि. ५ एप्रिल रोजी महपौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या उपस्थितीत शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व मनपाच्या सर्वांगीण कामाचा आढावा घेतला. अनेक रुग्णांना रेमिडीसिवर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे, परंतु रुग्णांना इजेक्शन सहजतेने उपलब्ध होत नसल्याचे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधत इंजेक्शन चा अनधिकृत साठा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच खाजगी मान्यताप्राप्त रुग्णालय यांना दैनंदिन लागणा-या इंजेक्शनचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या.

लातूर शहरात अनेक खाजगी चाचणी केंद्र येथे सिटीस्कॅन, आरटीपीसीआर, अँटीजन चाचणी करिता शासन मान्य दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जावू नये हे सुनिश्चित करण्यासह प्रत्येक खाजगी चाचणी केंद्र येथे शासन मान्य दर दर्शविणारा फलक लावला जाईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. शहरातील नागरिकांना वेळेत लसीकरण पूर्ण करण्याच्या अनुषंगाने शहरातील प्रत्येक प्रभागात किमान एक लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. सद्य परिस्थितीत लातूर शहरात मनपाचे ५ लसीकरण केंद्र सुरु असून येत्या दोन दिवसात आणखी ६ केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. ही संख्या किमान १८ करण्याबाबत आरोग्य विभाग आराखडा तयार करीत आहे. यावेळी उपायुक्त मयुरा शिंदेकर, डॉ. कलवले इत्यादी उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख यांचे प्रयत्न
राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनीदेखील लातूर शहरास रेमिडीसिवर इंजेक्शनची कमतरता भासणार नाही याकरिता शासन स्तरावरुन सूचना दिलेल्या आहेत. पालकमंत्री स्वत: या बाबत प्रयत्नशील आहेत.

न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान – नवाब मलिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या