जळकोट : रावणकोळा ते आतनूर रस्त्यावर असलेल्या जमदारे यांच्या शेतातील पोलमध्ये विजेचा प्रवाह उतरून , या विजेच्या धक्क्याने गाय आणि कालवडीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि ३ जून रोजी सकाळी अकरा च्या दरम्यान घडली .
रावणकोळा येथील विमलबाई वाघमारे यांची गाय आणि कालवड अतनूर ते रावणकोळा रोडवर असलेल्या जमदरे यांच्या शेतातून जात होते. यावेळी कालवाडीचा संपर्क विजेचा प्रवाह असलेल्या पोलला झाला, यानंतर कालवडील धक्क बसला लागलीच कालवडीजवळ गाय गेली गायदेखील यावेळी त्या पोलला चिकटून बसली व जागीच गाईचाही मृत्यू झाला.विजेचा धक्का एवढा जोरात होता की गाय आणि कालवड जागेवरच ठार झाली.
महावितरणच्या दुर्लक्षामुळे विजेचा प्रवाह पोलमध्ये उतरला, सुदैवाने या पोलला कुठल्याही नागरिकाचा संपर्क झाला नाही अन्यथा मोठा प्रसंग घडला असता. महावितरणने वेळीच जर दुरुस्ती केली असती या पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला नसता व एका गरीब महिला शेतक-याच्या गायीचा मृत्यू झाला नसता. गाय आणि कालवडी च्या मृत्यूमुळे विमलबाई वाघमारे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सरपंच सत्यवान दळवे पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे पाटील, भाजपाचे सत्यवान पांडे, बाजार समितीचे माजी संचालक मंगेश हुंडेकर, श्यामसुंदर पाटील, आदींनी केली आहे.