24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूर५४० पर्यावरण पुरक झाडे लावून जागतिक पर्यावरणदिन साजरा

५४० पर्यावरण पुरक झाडे लावून जागतिक पर्यावरणदिन साजरा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
ग्रीन लातूर वृक्ष टीम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एस.टी. महामंडळ लातूर, इंडीयन मेडीकल असोसिएशन, नॅशनल इंडीयन मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन बसस्थानक, अंबेजोगाई रोड परीसरात ५४० झाडांचा घनदाट वन
प्रक्ल्पाचा दुसरा टप्पा पुर्ण करण्यात आला. आयुर्वेदिक महत्व असलेली वड, पिंपळ, आंबा, करंज, अर्जुन,कडुंिनब अशी मोठी झाडे लावून त्यांना टॅकरद्वारे पाणी देण्यात आले.

यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी बी. पी. प्रथ्वीराज, मनपा लातूर उपायुक्त सौ. मंजुषा गुरमे, महाराष्ट्र प्रदूषन नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी परमेश्वर कांबळे, एस.टी. महामंडळ लातूरचे विभागीय अधिकारी सचिन क्षीरसागर, डॉ. भास्करराव बोरगावकर, पद्माकर बागल, नगरसेवक इम्रान सय्यद, डॉ. पवन लड्डा, नॅशनल इंडीयन मेडीकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. दयानंद मोटेगावकर नॅशनल इंडीयन मेडीकल असोसिएशन सचिव डॉ. शिवाजी बिराजदार, इंडीयन मेडीकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, इंडीयन मेडीकल असोसिएशन सचिव डॉ. मुकुंद भिसे, डॉ. रचना जाजू, अखिल भारतीय निमाचे डॉ. शांतीलाल शर्मा, निमा महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. निळकंठ सोनटक्के, महेष कदम, डॉ. संजय जोशी, डॉ. जयश्री जोशी, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. बालाजी सोळुंके, डॉ. पी.पी. शहा, डॉ. आर. के. पाटील, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते. सकाळी ६ ते ८ यावेळात सर्वांनी श्रमदानातून वृक्ष लागवडीचे कार्य केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या