22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरचापोलीत सिमेंट रस्त्याची कामे प्रगतीपथावर

चापोलीत सिमेंट रस्त्याची कामे प्रगतीपथावर

एकमत ऑनलाईन

चाकूर : तालुक्यातील चापोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणा-या प्रभाग क्रमांक ४ च्या स्थापनेपासून या भागात केवळ रामंिलंग कॉम्प्लेक्स ते गणेश तेलंगे यांच्या घरापर्यंतचा माजी खासदार जयवंत आवळे यांच्या निधीतील ५ लाख रुपयाचा रस्ता वगळता या भागात कुठेही रस्ते होऊ शकले नव्हते. परंतु या प्रभागातील सिंमेट रस्त्याच्या कामास गती आली आहे. चापोली येथे पक्क्या रस्त्याअभावी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वनवास होता. या भागातील नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात चिखलात पाय टाकून घरापर्यंतची वाट धरावी लागत होती, त्याच बरोबर या भागात स्वामी विवेकानंद विद्यालय सारखी नामांकित विद्यालय असल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी चिखल तुडवत या शाळेचा रस्ता शोधावा लागत होता. या भागात अनेक सदस्य झाले परंतु या भागातील नागरिकांना न्याय मिळत नव्हता. २०१७-२०२२ या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिकच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार सौ रेखाताई निलेश मद्रेवार यांनी जर मी विजय झाले तर या भागातील संपूर्ण रस्ते करून देईल असा शब्द या प्रभागातील नागरिकांना दिला होता.

सौ. रेखाताई निलेश मद्रेवार यांनी मागील वर्षभरापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून असलेले माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष निधीतून संग्राम कोडबळे ते संग्राम पाटील यांच्या घरापर्यंतचा १० लाख रुपयाचा रस्ता त्यांनी केला. तसेच या भागातील विविध रस्त्यांची कामे काही दिवसापूर्वी मंजूर केली होती. त्या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देऊन १५ व्या वीत्त आयोगाच्या माध्यमातून चापोली येथील जगन्नाथ मद्रेवार ते सोनटक्के यांच्या घरापर्यंत रस्ता, विश्वनाथ धोंडापुरे यांच्या घराकडील रस्ता, माधव गादगे यांच्या घराकडील दस्ता सोमेश्वर कोडबळे यांच्या घराकडील रस्ता, भरत पाचापुरे यांच्या घराकडील रस्ता हे रस्ते हे जवळपास १५ लाख रुपयाचे सिमेंट रोड तयार करण्यात येत असून या सर्व कामांना गती आली सौ.रेखाताई निलेश मद्रेवार यांनी त्यांच्या माध्यमातून चापोली ग्रामपंचायत करीत असल्याने समाधानही या भागातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या