31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home लातूर दहा दिवसांत लातूर शहरात कोरोना पॉझिटीव्हचे शतक

दहा दिवसांत लातूर शहरात कोरोना पॉझिटीव्हचे शतक

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहर महानगरपालिका हद्दीत दि. ३० डिसेंबर ते ८ जानेवारी या दहा दिवसांत २८१ अँटिजेन, ४२० आरटीपीसीआर असे एकुण ७०१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ११८ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. केवळ दहा दिवसांत लातूर शहरात १०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आले असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या कवेत गेले असताना प्रारंभीच्या सुमारे दोन महिन्यांचा काळ लातूर जिल्हा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून अलिप्त होता. त्यानंतर लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असताना लातूर महानगरपालिका क्षेत्रात मात्र कोरोना विषाणुचा शिरकाव झालेला नव्हता. राज्याच्या महानगरपालिका क्षेत्रांचा विचार केला तर लातूर महानगरपालिका क्षेत्र कोरोनामुक्त होते. मात्र काही दिवसांनंतर लातूर शहरातही कोरोनाच्या विषाणुने पाय रोवले आणि पाहता पाहता कोरोनाबाधितांची संख्या हजारापर्यंत पोहोचली.

सप्टेंबर २०२० मध्ये तर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण लातूर शहरासह जिल्ह्यात आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा, महापालिका आरोग्य यंत्रणेने सतर्कतेने कामाला सुरुवात केली आणि वेगाने पळणा-या कोरोनाच्या मीटरला आळा घातला. यात नागरिकांचेही योगदान मोठे आहेतच. परंतु, काळ पुढे गेला आणि कोरोनाविषयीची सतर्कता काहींशी बोथट झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. परिणामी लातूर शहारात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अद्यापही कोरोनाचे संकट दुर झालेले नाही त्यामूुळे नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, अनावश्यक गर्दी टाळणे या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

लातूर शहरात दि. ३० डिसेंबर रोजी १५ अँटिजेन, २७ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्याच ४ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दि. ३१ डिसेंबर रोजी ३४ अँटिजेन, १४ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. त्यात १२ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दि. १ जानेवारी रोजी १५ अँटीजेन, १४ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात ११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दि. २ जानेवारी रोजी २५ अँटीजेन, ४६ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या.

त्यात ११ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दि. ३ जानेवारी रोजी १८ अँटीजेन, ४२ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यातून १६ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दि. ४ जानेवारी रोजी ११ अँटीजेन, २६ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या त्यातून २० व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दि. ५ जानेवारी रोजी ३९ अँटीजेन तर ४९ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या त्यात १२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दि. ६ जानेवारी रोजी ४२ अँटीजेन, ७० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात ११ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दि. ७ जानेवारी रोजी ४९ अँटीजेन तर ८९ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या त्यात १४ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दि. ८ जानेवारी रोजी ३३ अँटीजेन तर ४३ आरटीपीसीआर चाचण्यातून ७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दहा दिवसांत २८१ अँटीजेन, ४२० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात ११८ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

८ हजार ७२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले
लातूर शहरात आजपर्यंत ९ हजार ३७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८ हजार ७२९ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी घेले आहेत. आजपर्यंत लातूर शहरातील २०९ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. मयतांपैकी ५० वर्षांपूढील व्यक्तींची संख्या १७२ एवढी आहे. एकुण मयत रुग्णांपैकी ५८ स्त्री तर १५१ पुरुष आहेत. सध्या ९८ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. सध्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्के आहे तर मृत्यूदर २.३१ एवढा आहे.

दुभंगलेल्या अमेरिकेचा परिपाक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या