लातूर : प्रतिनिधी
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा उघडकीस आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने २०१३ पासून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीस लागलेल्या सर्व शिक्षकांच्या मुळ प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक लातूरच्या अंतर्गत असलेल्या लातूर, उस्मानाबाद, नांदेड या तीन जिल्हयातील प्राथमिकचे १३१ तर माध्यमिक विद्यालयातील ५४ असे १८५ शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्या-ज्या जिल्हयाच्या शिक्षण विभागाने राज्य परीक्षा परीषद, पुणे यांच्याकडे पाठविले आहेत.
आरोग्य भरती परीक्षेतील घोटाळयाचा तपास करणा-या यंत्रणेच्या तपासात शिक्षक पात्रता परीक्षेतही घोटाळा झाल्याचे दिसून आले होते. त्यांनतर २०१३ पासून शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत असलेल्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळांतील शिक्षकांचे मुळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पाठवावे, अशा सुचना राज्य परीक्षा परिषद यांनी दिल्या होत्या. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक लातूरच्या अंतर्गत असलेल्या लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्हयातील १८५ शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्य परीक्षा परीषद, पुणे यांच्याकडे त्या-ज्या जिल्हयाच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी पाठविले आहेत. या पडताळणीत किती शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस आहेत. ते या पडताळणीतून समोर येणार आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा पात्र झालेल्या शिक्षकांच्या मनात धाकधूक वाढली आहे.
लातूर जिल्हयातून प्राथमिक विभागातील २१ शिक्षकांचे प्रमाणपत्र, नांदेड जिल्हयातून ९७, तर उस्मानाबाद जिल्हयातून १३ शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच लातूर जिल्हयातून माध्यमिक विभागातील ३० शिक्षकांचे प्रमाणपत्र, नांदेड जिल्हयातून १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र, तर उस्मानाबाद जिल्हयातून १० शिक्षकांचे शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्य परीक्षा परीषद, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
शिक्षकांच्या मनात धाकधूक वाढली
शिक्षक पात्रता परीक्षेचाही घोटाळा उघड झाल्याने शालेय शिक्षण विभागाने २०१३ पासून शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊन इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळेत जे शिक्षक सेवेत त्या शिक्षकांचे मुळ प्रमाणपत्र तपासणीचा निर्णय घेतला. विभागीय शिक्षण उपसंचालक लातूरच्या अंतर्गत असलेल्या लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्हयातील १८५ शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्य परीक्षा परीषद, पुणे यांच्याकडे त्या-ज्या जिल्हयाच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी पाठविले आहेत. प्रमाणपत्र पडताळणीत किती शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस आहेत. ते पडताळणीतून समोर येणार आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा पात्र झालेल्या शिक्षकांच्या मनात धाकधूक वाढली आहे.