23.2 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeलातूरराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा 'देशिकेंद्र'च्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा ‘देशिकेंद्र’च्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी येथील देशिकेंद्र विद्यालयात दि. १ डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या टोकदार प्रश्नांना तितकीच स्पष्टपणे उत्तरे देत सुसंवाद चांगलाच रंगवला . शिवाय आपल्या दहावी-बारावीच्या शालेय जीवनातील यशात लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा मोठा वाटा असून येथे दिल्या जाणा-या दर्जेदार शिक्षणाचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी पुढे बोलताना रुपाली चाकणकर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आपला शैक्षणिक पट विद्यार्थ्यांसमोर मांडला व शिक्षणामुळेच मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले असल्याचे सांगून शिक्षणाला महत्त्व द्या. शिक्षणामुळे धाडस येते, धाडसामुळे आयुष्यातील चढ, उतारांना यशस्वी सामोरे जाऊ शकतो, असे स्पष्ट करुन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून समाजातील जागरुक नागरिक बनण्याचे आवाहनही केले. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीत बाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांसोबत प्रश्नांनोत्तरे चांगलीच रंगली.विद्यार्थ्यांनी अनेक टोकदार प्रश्न विचारली व त्यांनीही त्या प्रश्नांना तशीच स्पष्टपणे व दिलखुलासपणे उत्तरेही दिली.
तत्पूर्वी, विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक रुपसिंग सगर यांनी रुपाली चाकणकर व उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी माजी मुख्याध्यापक शिवशंकर खानापुरे, गुरुलिंग धाराशिवे, उपमुख्याध्यापक बसलिंग भुजबळ, दयानंद रामपुरे, मनोज दानाई, वर्षा सांडे व अनेक मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन पर्यवेक्षक शिवानंद स्वामी यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या