24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home लातूर चाकूरची शिवसेना अंतर्गत बंडाळीने पोखरली

चाकूरची शिवसेना अंतर्गत बंडाळीने पोखरली

एकमत ऑनलाईन

चाकूर : शिवसेना अंतर्गत बंडाळीने पोखरली असून फक्त पदाचा हव्यास, विकासाची गंगा माञ कोसो दूर अशी अवस्था चाकूर सेनेची झाली आहे. आठ महिन्यात दोनदा वेगवेगळ्या व्यक्ती तालूका प्रमुख म्हणून नेमल्या आणि तिनदा तीन वेगवेगळ्या व्यक्ती ची जिल्हा उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची पताका खांद्यावर घेऊन काम करणा-या सच्चा शिवसैनिक म्हणून कोण बाजी मारणार हा खरा प्रश्न जनतेला पडला आहे.

कोरोनासारख्या महामारीचे संकट कोसळले असताना अशा लॉकडऊन काळात शिवसेनेच्या काही तथाकथीत नेत्यांच्या
पुढाकारातून चाकूर शिवसेना तालुका प्रमुख निवडण्याची उटाठेव केली आहे.शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश नसताना नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे एका अज्ञात ठिकाणी बैठक घेऊन चाकूर येथील एका शिवसेना नगरसेवकाच्या संपर्क कार्यालयात प्रभारी तालुका प्रमुख म्हणून एका व्यक्तीला नियुक्ती पञ देण्यात आले आहे. ही व्यक्ती इतर पक्षातून आलेला कार्यकर्ता असून तो सच्च्चा शिवसैनिक नाही, अशी खदखद शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिका-यांत असल्याची चर्चा आहे. या निवडीवर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे.

तालूका प्रमुखाच्या निवडीनंतर बेटाच्या पायथ्याशी नाराजांची बैठक झाली , माजी तालूकाप्रमुख यांनी पदाला न्याय दिला नाही आता आजी तालूका प्रमुख तरी न्याय पदाला देतील का असा सूरही बैठकीत निघाला होता.आजी माजी तालुकाप्रमुख पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आणि वरिष्ठ शिवसेना नेत्यांच्या आदेशाने या निवडी होणे गरजेचे आहे. या निवडीवर शिवसेनेचे नगरसेवकही नाराज असल्याची चर्चा ञिमुर्ती चौकात ऐकायला मिळत होती.

शिवसैनिकांच्या निवडी या जिल्हा किंवा तालुकास्तरावरुन होत नाहीत तर त्या मुंबई मातोश्रीवर व शिवसेना भवना वरुन होतात.या तथाकथित नेत्याना हा निवडीचा अधिकार कोणी दिला असा असा प्रश्न आळवला जात आहे. शिवसेनेचे राज्य असताना तालुक्यातील विविध विकासाची कामे प्रलंबित असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्ते, पाणी, जलसिंचन, वीज, शिक्षण आणि इतर विविध विकासकामांचे प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी का प्रयत्न करीत नाहीत. चाकूर नगरपंचायत असलेले नगर, या नगरीच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असताना पदाधिका-याच्या निवडीला का प्राधान्य ? असा सवालही जाणकार करीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

Read More  नांदेडात कोरोनाचा कहर २०३ पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या