25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरचंद्रभागा स्वच्छतेसाठी हजारो हात एकवटले

चंद्रभागा स्वच्छतेसाठी हजारो हात एकवटले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने पंढरपूरात ‘रोटरी चंद्रभागा स्वच्छता व जन- जागरण अभियान’ राबविण्यात आले. चंद्रभागेचा परिसर स्वच्छ करण्यासाठी हजारो हात एकवटले होते. रोटरीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या संकल्पनेतून व विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज यांच्या सहकार्याने रविवार दि. ५ जून रोजी हे अभियान राबविण्यात आले.

डॉ. मोतीपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे माजी अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख अ‍ॅड. नंदकिशोर लोया, रोटरी क्लब लातूर मिडटाऊनचे माजी अध्यक्ष उमाकांत मद्रेवार, रोटरी क्लबचे सचिव लक्ष्मीकांत सोनी, मेघराज बरबडे यांच्या नेतृत्वाखालील हजारो रोटेरीयन रविवारी पंढरपूर दाखल झाले. लातूरसह पंढरपूर, सांगोला, अकलूज, टेंभूर्णी येथूनदेखील रोटेरीयन या अभियानात सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजता श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदी किनारी ‘महाद्वार घाट ते कुंभार घाट’ परिसर स्वच्छ करण्यासाठी शेकडो रोटेरीयन, स्वयंसेवक व नागरिक एकत्र आले. हभप गहिनीनाथ महाराज यांच्या आशिवर्चनानंतर या स्वच्छता अभियास प्रारंभ झाला. जवळपास दोन ते अडीच तास हे स्वच्छता अभियान चालले. यातून हजारो टन कचरा, प्लास्टिक गोळा करण्यात आला.

पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे प्रांत अधिकारी गजानन गुरव व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, लातूर कॅप्सचे अध्यक्ष शशिकांत चलवाड, रोटरीचे सहायक प्रांतपाल संतोष भोसले, संचालक दिलीप प्रभुणे, प्रकल्प प्रमुख उमाकांत मद्रेवार, अ‍ॅड. नंदकिशोर लोया, पंढरपूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विश्­वास आराध्ये, महेश निर्मळे, लातूरचे डॉ. विनोद लड्डा, सुधीर लातुरे, सतीश कडेल, रुद्रा रिफ्रेजिरेटर्सच उमेश पत्रावळे, रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे अध्यक्ष किशोर निकते, सचिव प्रशांत कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष विजय म्हेत्रे, सचिव श्रीपती अडंिलगे, रोटरी क्लब ऑफ अकलूजचे अध्यक्ष नितीन कुदळे, सचिव गजानन जवंजळ, रोटरी क्लब ऑफ टेंभूर्णीचे अध्यक्ष नागेश कल्याणी सचिव सुजित बेलपत्रे आंिदची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे देशभरातून दररोज हजारो वारकरी दर्शनासाठी येतात या वार्क­यांसाठी थंड पाण्याची सोय व्हावी म्हणून श्रीकृष्ण मंदीर गोपाळपूर येथे ‘जल प्रसाद’ उभारणी करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या