22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरबाललैंगिक अत्याचार, आरोपीस १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

बाललैंगिक अत्याचार, आरोपीस १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी २०१७ मध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या गुन्हयातील आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. अमोल उर्फ रत्नाकर बाबुराव प्रयाग (५०) याच्या मुलीसोबत पीडित अल्पवयीन मुलगी खेळण्यासाठी घरी आली असता प्रयाग याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पीडित मुलीच्या नातेवाईकाने ३० जानेवारी २०१७ मध्ये तक्रार दिलेल्या तक्रारी नुसार इतर कलमांच्या बरोबर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम-२०१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक माधवी मस्के व महिला पोलीस उपनिरीक्षक उमाप, पोलीस उपनिरीक्षक इंगेवाड यांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास करून साक्षीदाराकडे सखोल विचारपूस करून आरोपी विरुद्ध सबळ व भौतिक पुरावे गोळा करून विशेष सत्र न्यायालय, लातूर येथे आरोपीविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

सदर दोषारोपत्रा मध्ये आरोपीविरुद्ध भरपूर पुरावे असल्याने विशेष सत्र न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी आरोपी अमोल उर्फ रत्नाकर बाबुराव प्रयाग याला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ५०० रुपयांचा दंड सुनावला आहे. नमूद गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात तत्कालीन तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक माधवी मस्के, महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगेवाड यांनी गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून आरोपीस शिक्षा घडवून आणली. तसेच सध्या ट्रायल मॉनिटरिंग सेल येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस अमलदार ज्योतीराम माने, महिला पोलीस अंमलदार शितल आचार्य, पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले परिश्रम घेतले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मंगेश महिंद्रकर यांनी बाजू मांडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या