21.8 C
Latur
Monday, September 21, 2020
Home लातूर मुलांनी भारतीय सेनेत जाऊन देशसेवा करावी

मुलांनी भारतीय सेनेत जाऊन देशसेवा करावी

एकमत ऑनलाईन

लातूर : फक्त आयटी व वैद्यकीय क्षेत्रात किंवा प्रशासकीय सेवेत करीअर घडत असते हा पालकांचा चुकीचा समज आहे. भारतीय सेनेत (एनडीए) मुला-मुलींना करीअर घडवत येते. एनडीए दाखल झालेल्यांना फक्त करीयरच घडवतायेत नाही तर देशसेवापण करता येते. त्यामुळे इतर क्षेत्राप्रमाणे भारतीय सेना करीयर व देशसेवेसाठी तितकीच महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन कर्नल गिरीधर कोले यांनी केले.

लातूर जिल्ह्याचे सुपूत्र कर्नल गिरीधर धोंडीराम कोले हे राष्ट्रपती सेना मेडलने सन्मानीत असून ते शिरुर अनंतपाळ तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवाशी आहेत. शेतकरी ते वारक-याचा मुलगा आणि भारतीय सेनेतील राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीरपर्यंतचा जीवनप्रवास कोले यांनी आपल्या संवाद यात्रेत मांडत पालक व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ९ ऑगस्ट क्रांती दिनी झुम मिटींगच्या माध्यमातून संवाद यात्रा या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आनंदवाडीसारख्या एका खेडेगावात एका शेतकरी वारक-याच्या पोटी जन्माला आलेला एक मुलगा चवथी इयत्तेपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळैत शिकून ५ किलोमिटर पायी चालत जावून पाचवी इयत्तेत दाखल होतो. देशप्रेम आणि देशसेवा ओतप्रोत भरलेल्या या तरूणास भारतीय सेनेत दाखल होण्याची स्वप्न पडतात. तो पुढे चालून सातारा सैनिक स्कुलमध्ये प्रवेश घेतो आणि एक-एक शिखर प्राताक्रांत करीत कर्नल या सर्वोच्च पदापर्यंत पोहचतो. हा तरूण दुसरा-तिसरा कोणी नसून लातूर जिल्ह्याचा सुपूत्र गिरीधर कोले हा आहे. कर्नल कोले यांनी जवळपास दोन तासाच्या आपल्या मुक्त संवादातून आपला प्रेरणादायी जीवनप्रवास ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पातील विद्यार्थी व पालकांसमोर मांडला.

नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एडीए) आणि भारतीय सेना (इंडीयन आर्मी) ही मुले व मुलींसाठी करीअर घडविण्यासाठी महत्वपूर्ण असून १९ व्या २० व्या वर्षी पंचतारांकीत सुविधा असणारे आणि करीयर घडवणारे यासारखे दुसरे चांगले माध्यम नाही, असे सांगत कर्नल गिरीधर कोले यांनी भारतीय सेना ही केवळ मुलांसाठीच नाही तर मुलींसाठी सुध्दा तेवढेच महत्वाचे आहे. मुलींनी आपले करीयर भारतीय सेनेत करायला कांही हरकत नाही. मुलींसाठी भारतीय सेनेचे दरवाजे उघडलेले आहेत, असेही ते म्हणाले.भारतीय सेनेत महिलांचा सन्मान, शिस्त, आत्मविश्­वास, शारिरीक तंदुरूस्ती, सहभाग, मैत्री,इतरांची काळजी, करीयर या बाबी प्रामुख्याने शिकवल्या जातात. भारतीय सेनेत दाखल झालेली व्यक्ती स्वत:च्या शारीरिक तंदुरूस्ती बरोबरचे देशाला तंदुरूस्त ठेवणसाठभ सक्षम असतो. त्यामुळे मुलांनी भारतीय सेनेत दाखल होण्यासाठी पुढे यावे असे आवानही त्यांनी यावेळी बोलतांना केले.

ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे संचालक सतीश नरहरे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका व संचालिका सविता नरहरे यांनी कोले यांचा परिचय करुन दिला. पर्यवेक्षक अशोक गुरदाळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी कर्नल कोले यांनी विद्यार्थ्यांना विद्यालेल्या प्रश्­नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले. नरहरे क्लासेस व ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पातील मधील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतक-याने केली मिलिया-डुबिया झाडांची लागवड

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी आणखी ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण...

इम्रान खान सरकार ‘नालायक’; अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली : नवाझ शरीफ

इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 'नालायक' असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ...

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

बेरोजगारीचा भस्मासुर!

देशावर मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट कोसळले! आता सप्टेंबर महिना अर्धा संपलाय पण अद्याप कोरोनाचे संकट थोडेसेही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी आणखी ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण...

इम्रान खान सरकार ‘नालायक’; अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली : नवाझ शरीफ

इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 'नालायक' असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ...

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

सोयाबीन शेतक-यांच्या मुळावर

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : अनेक अडचणींचा सामना करत पिकविलेल्या सोयाबीनला शेवटी पावसाचा फटका बसल्याने बाधित सोयाबीनच्या पंचनामाच्या प्रतिक्षेतच शेतक-यांनी काढणीला सुरूवात केली आहे....

अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान

निलंगा : निलंगा, देवणी, शिरुरअनंतपाळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व कांही ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे होऊन शेतक-यांच्या पिकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब...

औसा शहरासह तालुक्यात पावसाचा कहर

औसा : औसा शहरासह तालुक्यात शनिवार दि. १९ सप्टेंबर मध्यरात्री अतिवृष्टीने कहर केला असून शहरातील जुन्या घरांच्या भिंती पडल्या असून अनेक शेतक-यांच्या शेतातील खरीप...
1,254FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...