23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरउदगीरात सिगारेटच्या धुरामुळे तरुणाचा भोसकून खून

उदगीरात सिगारेटच्या धुरामुळे तरुणाचा भोसकून खून

एकमत ऑनलाईन

उदगीर : शहरातील रेल्वे स्टेशन रोडजवळ असलेल्या बसवेश्वर चौकात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिगारेटच्या धूर तोंडाकडे येत असल्याने झालेल्या वादातून हा खून झाला आहे.

जगदीश विजय किवंडे हा सिगारेट ओढत थांबला असता, त्याच्या शेजारीच सोन्या नाटकरी हा येऊन थांबला. विजय सिगारेट ओढत असताना त्या सिगारेटचा धूर सोन्या नाटकरे याच्या तोंडाकडे जात होता. त्यामुळे नाटकरे यांनी जगदीश यास सिगारेटचा धूर बाजूला सोड, म्हणत असताना दोघांमध्ये मारहाणीची घटना घडली. यातूनच सोन्या नाटकरे याने कमरेला असलेला चाकूने त्याच्या पोटात खुपसला. त्यामुळे जगदिश विजय किवंडे हा गंभीर जखमी झाला, त्यास उपचारासाठी लातूर कडे घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताची नातेवाईक सुनिता विजय किवंडे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सोन्या नाटकरे याच्याविरुद्ध कलम ३०२ भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ऐडके यांच्याकडे देण्यात आला आहे. शहरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे आणि त्यांच्या पथकाने चौख बंदोबस्त ठेवल्याने परिस्थिती चिघळली नाही. चौका चौकात पोलिसांनी गस्त चालू ठेवल्यामुळे शहरात तणावपुणॅ शांतता आहे.

तीन जिल्हा परिषद शाळेत प्लास्टिक तांदूळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या