लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी शुक्रवार दि. ८ जुलै रोजी सकाळी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला. संबंधितांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना केल्या. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी यांनी यावेळी सदिच्छा भेट घेऊन यावेळी परीवारातील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
यावेळी माजी महापौर दीपक सुळ, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, व्हाईस चेअरमन श्याम भोसले, दगडूसाहेब पडीले, माजी नगरसेवक कैलास कांबळे, अशोक गोविंदपुरकर, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, पुनीत पाटील,, पप्पू देशमुख, लातूर जिल्हा सोशल मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, लातूर एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, शैलेश भोसले, करीम तांबोळी अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूरचे अध्यक्ष मिथुनराजे गायकवाड, अभिमान भोले, सुंदर पाटील कव्हेकर, सुभाषआप्पा सुलगुडले, सूर्यकांत कातळे, गोटू यादव, प्रवीण पाटील, विकास कांबळे, सचिन माने, महेश सन्मुख, राकेश भोसले, प्रा. संजय जगताप, हनमंत पवार, चंद्रकांत साळुंखे, विजय धुमाळ, बिभीषण सांगवीकर आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.