25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरजळकोट येथे जमावबंदीतही नागरिक बेगुमान

जळकोट येथे जमावबंदीतही नागरिक बेगुमान

एकमत ऑनलाईन

जळकोट : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कलम १४४ कलम लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी दि.१५ एप्रिलपासून सुरू झाली परंतु जळकोट येथे मात्र अनेक नागरिक एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक नागरिकांच्या तोंडाला मास्क दिसून येत नाही यामुळे आणखीनच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लादले असले तरी ,यामधून अनेक दुकानांना तसेच कार्यालयांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला वगळण्यात आलेले आहे . यामुळे नागरिक हे जळकोट या तालुक्याच्या ठिकाणी येत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे जळकोट येथे गर्दीचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे दुचाकीवर अनेक जण विनाकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. जळकोट येथील एसबीआय बँकेसमोर तर नागरिक हे तोंडाला मास्क न लावता एकत्र बसत असल्याचे दिसून येत आहे, हे सर्वांसाठी धोकादायक आहे. कलम १४४ मध्ये पाच नागरिकांना एकत्र बसता येत नाही परंतु जळकोटमध्ये मात्र वीस माणसे एकत्र बसत असल्याचे दिसून येत आहे . यामुळे कुठेतरी जळकोट शहरात कलम १४४ ची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे .

जळकोट शहरात माणसे तरी एकत्र येतच आहेत परंतु वाहनांची संख्या देखील कमी झालेली दिसून येत नाही. राष्ट्रीय महामार्गावरून असंख्य वाहने दररोज ये-जा करीत आहेत.यामुळे जळकोट तालुक्यातील जनता या लॉकडाउनला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे . असेच सुरू राहिले तर मात्र येणा-या काळात जळकोट तालुक्यात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी मात्र परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल

नांदेड जिल्ह्यात १ हजार ३५१ व्यक्ती कोरोना बाधित,२५ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या