27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरमांजरा नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहावे

मांजरा नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहावे

एकमत ऑनलाईन

लातूर : मांजरा प्रकल्पात सातत्याने पाण्याची आवक सुरु असल्याने हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. पूर नियंत्रण करण्यासाठी धरणातील अतिरिक्त पाणी मांजरा नदीव्दारे तसेच कालव्यातून ठरवलेल्या नियमाप्रमाणे सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मांजरा नदीवरील बरालदेखील पूर्णपणे भरले असून धरणातून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडल्यास तसेच येणारा पाण्याचे आवक वाढत राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मांजरा नदी वरील सर्व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

पुढील दोन-तीन दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील काही मध्यम प्रकल्प, बराज पूर्ण क्षमतेने भरले आहेत व काही मध्यम प्रकल्प भरण्याची शक्यता निर्माण झाली असून परिस्थितीनुरुप केंव्हाही प्रकल्पातील पाणी विसर्ग करावे लागणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे. त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क रहावे. संभाव्य पूरपरिस्थिती व विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी पूढील प्रमाणे काळजी घ्यावी.

या कालावधीत विजा पडण्याची शकयता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतक-यांनी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्यूत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा.

जलसाठयाजवळ, नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असताना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. पाऊस सुरु असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. स्थानिक पोलीस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक, (शहरी भागात मनपा, न. प. योंचे अधिकारी) यांचेशी संपर्कात राहून ते देत असलेल्या सूचनांचे पालन करावे. आपल्या आप्तेष्टांना तसेच गावक-यांना सावधगीरीची सूचना देवून योग्य ती उपायोजना करावी.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या