27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूर५० मोठे तर ७० लहान नाल्यांची सफाई पूर्ण

५० मोठे तर ७० लहान नाल्यांची सफाई पूर्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : पावसाळा काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मान्सुनपूर्व नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहेत. लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मोठे ६० तर लहान ९५ नाले आहेत. महानगरपालिकेने त्यापैकी मोठे ५० तर लहान ७० नाल्याची सफाई केली आहे. उर्वरीत मोठे १० व लहान २५ नाल्यांची सफाई येत्या पाच दिवसांत पुर्ण होणार आहे.

लातूर शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत दि. २८ एप्रिल २०२२ पासून मान्­सुनपूर्व नालेसफाईचे काम महानगरपालिका आयुक्­त अमन मित्तल यांच्­या मार्गदर्शनाखाली हाती घेण्­यात आले आहे. यावर्षी मान्­सुन लवकर असल्­याने नालेसफाईचे कामे लवकर हाती घेण्­यात आले. लातूर शहर महानगरपालिका हद्दीत मोठ्या नाल्­यांची संख्­या ६० असून लहान नाल्­यांची संख्­या ९५ एवढी आहे. या नाल्­यांपैकी मोठे नाले ५० एवढे साफ झाले असून फक्­त १० नाले साफ करणे बाकी आहे. लहान नाल्­यापैकी ७० नाले साफ झाले असून उर्वरीत २५ एवढे नाले येत्­या पाच दिवसांत पुर्ण होणार आहे.

शहरात मान्सुनपूर्व नाले सफाईचे काम दरवर्षी होत असते. परंतू, मोठा पाऊस पडल्यानंतर शहरात काही प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्नही दरवर्षी कायम असतात. नालेसफाई करणे जसे गरजेचे आहे तसेच काही प्रश्नांकडेही पाहणे आवश्यक आहे. शहरातील जयनगर, महादेवनगर, करीमनगर, इंदीरानगर, राजीवनगर, अंजलीनगर, इस्लामपुरा, क्वॉईलनगर, राम-रहिमनगर अशी काही सखल नगरे आहेत तिथे मोठा पाऊस पडल्यानंतर नागरिकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. या भागातील गटारी आवश्यकते पेक्षा कमी आहेत. ज्या आहेत त्या लहान आणि रस्त्याला समांतर आहेत.

ज्या नाल्या आहेत त्या नाल्यांची साफसफाई वेळोवेळी झालेली नसल्यामुळे या गटारी कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्यांनी तुंबलेल्या आहेत. मोठा पाऊस आला की या सखल नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. गटारीतील घाण रस्त्यावर येते. पावसाचे पाणी आणि गटारीचे घाण पाणी घरांत शिरते. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना असंख्य प्रश्नांना तोंड देत रात्रभर जागरण करावे लागते. अंजलीनगर व इस्लामपुरा परिसरातील सखल भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाच्या पाण्यात वाहुन आलेल्या कचरा, घाणीसोबतच सापांचीही भिती असते. दरवर्षीचा प्रश्न असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने समतल भागातही मान्सुनपूर्व आवश्यक कामे करणे गरजेचे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या