Saturday, September 23, 2023

स्वच्छता मोहीम ही चळवळ होण्याची गरज

लातूर : प्रतिनिधी
महात्मा गांधीजीच्या स्वच्छ भारताचे स्वप्न साकार व्हावे. तसेच श्रमदानातून सामाजिक बांधिलकी जपावी व त्यांनी राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे. या हेतूने सर्व कृषिच्या विद्यार्थ्यानी महाविद्यालयात स्वच्छता अभियान व श्रमदान करावे. यातून स्वच्छता मोहीम ही चळवळ व्हावी, असे प्रतिपादन सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कृषि महाविद्यालय लातूर येथे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परीषद, पुणे येथील संचालक शिक्षण प्रा .हेमंत पाटील, डॉ. विश्वनाथ कांबळे, डॉ. दिनेशंिसह चौहान हे उपस्थित होते. यावेळी ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत उपस्थित मान्यवरांनी मृदेचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे या हेतूने ओंजळीत मृदा घेवून विद्यार्थ्यांना अवलोकन करण्यास सांगितले. यामध्ये गाजरगवत निर्मुलन, प्लास्टिक मुक्ती, वृक्षसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, तंबाखूमुक्त परिसर हे उपक्रम राबवले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ. विलास टाकणखार, डॉ. विठोबा मुळेकर, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. विजय भामरे, डॉ. राजेश शेळके, डॉ. अनंत शिंदे, डॉ. पद्माकर वाडीकर, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. दयानंद मोरे, डॉ. सुनिता मगर, डॉ. प्रभाकर आडसूळ, डॉ.विनोद शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. संघर्ष शृंगारे, भगवान कांबळे, यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, शिक्षक वर्गीय, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविली.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या